किर्ती आरोटे
द पौइंट नाऊ प्रतिनिधी: शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेनंतर आता शिवसेनेच्या निवडणूक चिन्ह अर्थातच धनुष्य बाणावर शिंदे गटाचा दाव लागल्याच पाह्यला मिळतंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दुसऱ्या निशाणीवर निवडणूक लढविण्यासाठी तयारीत राहण्याचे आदेश दिलेत अस काही वृत्तांकडून सांगण्यात येतंय.
मात्र केवळ आमदारांच्या एकूण संख्याबळाच्या माध्यमातून धनुष्यबाणावर वर्चस्व प्रस्थापित करणे शिंदे गटाला शक्य आहे का? यासंदर्भात अनेक दावे केले जात आहेत. शिंदे गटानुसार आमचा गट हीच खरी शिवसेना आहे, शिवाय आमच्याकडे आमदारांच संख्याबाळही आहे. त्यानुसार पक्षाच नाव, चिन्ह मिळविण्यासाठी शिंदे गट आग्रही आहे.
याधीही भारतात असे अनेक वाद झालेत तेव्हा निवडणूक आयोगाने काय निर्णय घेतला?
२०२१ साली बिहार विधानसभा निवडणुकीत रामविलास पासवान यांनी स्थापन केलेल्या लोकजनशक्ती पक्षात बंडखोरी झाली होती पासवान यांचा मुलगा चिराग पासवान आणि पशुपती पारस यांच्यात भांडण सुरु झाली. जेव्हा हा वाद निवडणूक आयोगाकडे आला तेव्हा त्यांनी पासवान गटाला हेलीकॉप्टर आणि पशुपती गटाला शिवणयंत्र हे चिन्ह प्रदान केल होत.
१९७७ साली इंदिरा गांधी यांनी भारतीय कॉंग्रेस पासून स्वतंत्र होऊन आपला वेगळा इंदिरा गट स्थापन केला, मात्र त्यांना पक्ष चिन्ह गायींची जोडी मिळालाच नाही. त्यांनी हाताचा पंजा हे चिन्ह घेतल.
एकनाथ शिंदे गटाच्या बाबतीत काय?“
अनेकदा निवडणूक आयोग दोन्ही पक्षांना वेगळी चिन्ह नेमून देत.” अगदी अलीकडे कॉंग्रेसच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत गटबाजी अगदी सहज पाहायला मिळून येते. मध्य प्रदेश मध्ये कॉंग्रेसचा उमेदवारही हाताच्या पंजावर लढू शकला नाही आणि विरोधकालाही चिन्ह मिळू शकल नव्हत.”
त्यामुळे आता हे पाहणे औचित्याचे ठरेल कि निवडूक आयोग यावर काय निर्णय देणार मात्र सध्या धनुष्यबाण शिवसेनेचाच राहील, तसच शिवसेना कुठेही गेलेली नाही अस संजय राऊत यांनी म्हणलय ते नाशिक येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान पक्षातील दोन तृतीयांश संख्याबळ एकनाथ शिंदे गटाकडे असल्यामुळे कायद्यानुसार, पक्षाच चिन्ह शिंदे गटाकडे मिळेल असा दावा शिंदे गटाकडून केला जातोय.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम