खातेवाटपावर शिंदेगटाचे मंत्री नाराज, मात्र मंत्र्यांनी फेटाळले नाराजीचे वृत्त

0
16
Malegaon
Malegaon

मुंबई – शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला आणि त्यानंतर स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला अखेरीस खातेवाटपही जाहीर झाले. पण शिंदे गटातल्या मंत्र्यांना दुय्यम दर्जाची खाती मिळाल्यामुळे गटामध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. कॅबिनेट मंत्री दादा भुसे, दीपक केसरकर हे मंत्री नाराज असल्याची माहिती समोर आली. पण, मंत्र्यांनी नाराजीचे वृत्त फेटाळत आम्ही आमच्या खात्यांवर समाधानी असल्याचा खुलासा केला आहे.

काल झालेल्या खातेवाटपात भाजपने बरीच महत्वाची खाती आपल्याकडे घेतल्याने शिंदे गटातील बरेच मंत्री हे नाराज होते, त्यामुळे हे मंत्री नॉट रिचेबल झाले होते. त्यापैकी शिवसेनेशी बंडखोरी करून शिंदे गटात सामील झालेले मालेगावचे आमदार दादा भुसे यांचा कॅबिनेटमध्ये सहभाग झाला, पण खातेवाटपात त्यांना बंदरे व खनिकर्म खाते देण्यात आले आहे. त्यामुळे दादा भुसे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. अखेर भुसेंनी स्वतः यावर खुलासा केला.

मी स्वताहून कृषीमंत्री पदाऐवजी अन्य मंत्रीपद घेतले – दादा भुसे

‘खातेवाटपाबाबत मी नाराज नाही, मागील सरकारच्या काळात मी कृषीमंत्री होतो. पण प्रवास करत असताना मला दगदग सहन होत नव्हती. म्हणून त्यावेळी सुद्धा खाते बदलून मिळावे, अशी विनंती केली होती. आतादेखील प्रकृतीच्या कारणास्तव आपण स्वतःहून कृषीमंत्री पदाऐवजी अन्य मंत्रीपद घेतले’, असा खुलासा दादा भुसे यांनी केला. तसेच, ‘मला जे मंत्रिपद मिळाले आहे त्याला न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि  मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीसजी यांनी एकत्रितपणे निर्णय घेऊन ज्या जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबादारी देतील ती पार पाडणार आहे’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मी माझ्या खात्यावर नाराज नाही – दीपक केसरकर

दुसरीकडे, मंत्री दीपक केसरकर यांनीही आपल्याला मिळालेल्या खात्यावर मी समाधानी असल्याचे सांगत नाराज असल्याचे वृत्त फेटाळले आहे. जी खाती माझ्याकडे आली तरी मी त्याच्यावर अत्यंत अभ्यास पूर्ण काम करतो. शिक्षणाचा दर्जा तर राखलाच पाहिजे, परंतु मुलांच्या शिक्षणाचा जागा असतात त्याठिकाणी लक्ष देणे गरजेचे आहे. राज्याच्या शिक्षण विभागात वारंवार पॉलीसी बदलू शकत नाहीत त्यामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ शकतो. मी कुठेही नाराज नाही, कुठल्याही खात्याचे काम करण्यास आपण सक्षम आहोत, असे केसरकर म्हणाले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here