Sharad pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स झळकत आहेत. या बॅनर्सवर शरद पवारांचेही फोटो आहेत, यामुळे संतापलेल्या शरद पवारांनी अजित पवारांच्या गटाला परवानगीशिवाय फोटो वापरण्यास मनाई केली आहे
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाल आहे. यातच शरद पवार आपले गुरु आहेत तसेच त्यांच्या संमती नंतरच अजित पवार आणि इतर आमदार आणि मंत्र्यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला असल्याचं अजित पवार समर्थकांकडून बोलले जात आहे. मात्र आपला यासोबत कोणताही संबंध नसल्याचे सांगत शरद पवारांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. यातच अजित पवार आणि शपथ घेतलेल्या इतर आठ मंत्र्यांच्या समर्थकांकडून अभिनंदनचे बॅनर्स लावले जात आहेत. यावर शरद पवार यांचा देखील फोटो लावला जात असल्याने शरद पवारांनी माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरण्यात यावा. मी त्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, त्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. याऊलट ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला. ज्यांच्याशी माझे आता वैचारिक मतभेद आहेत. त्यांनी यापुढे माझ्या परवानगीनेच माझा फोटा वापरावा. त्या पक्षानेच माझा फोटो वापरावा. अन्य कुणीही माझ्या परवानगीशिवाय फोटो वापरू नये, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
बंडखोरी केल्यानंतर अजित पवारांनी आतापर्यंत अनेकदा आपले नेते शरद पवारच असल्याच स्पष्ट केले आहे. एवढेच नाही तर त्यांच्या समर्थक आमदारांनीही त्यांचीच री ओढली आहे. पण आता शरद पवारांच्या या भूमिकेमुळे त्यांची व त्यांच्या गटाची चांगलीच गोची होण्याची शक्यता आहे. भाजपच्या गोटातील सूत्रांनी सांगितल्यानुसार, अजित पवार यांचा सरकारमध्ये समावेश करण्याचा निर्णय २ दिवसांपूर्वीच घेण्यात आला होता. त्याची सुरुवात २८ जून रोजी झाली. विहीत राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक झाली. व्यासपीठावरील पोस्टर्समध्ये शरद पवार यांच्यासह कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांचा समावेश होता. अजित पवारांना पोस्टरमध्ये स्थान मिळाले नाही.
दरम्यान एकीकडे राज्यातील राजकारणाला दिवसेंदिवस वेगळं मिळत असताना दुसरीकडे अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांसोबत आपला वैचारिक मतभेद असल्याचं स्पष्ट करत शरद पवारांनी आपले फोटो बॅनर्स वर वापरू नये अशी तंबी दिल्याने राजकारणाला आता वेगळं मिळत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम