Sharad Pawar | ‘मविआ’च्या मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवारांनी केली भुमिका स्पष्ट

0
21
#image_title

Sharad Pawar | सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू असून प्रचार आणि सभांनी राज्यभरात धुरळा उडवला आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातून निवृत्त होणाऱ्या अशा चर्चांनी जोर धरला होता. तसेच दुसरीकडे निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? या चर्चाही सुरू होत्या. अशाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी याबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे.

Sharad Pawar | भुजबळांविरुद्ध शरद पवारांची खेळी?; येवला मतदार संघातून कोण फुंकणार तुतारी

शरद पवारांनी केली भुमिका स्पष्ट

वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी, “निवडणुकीनंतर आम्ही सर्व एकत्र बसून ज्या पक्षाचे आमदार जास्त असतील त्यांना त्यांचा प्रतिनिधी निवडायला सांगू व त्याला आम्ही पाठिंबा देऊ. ही आमची भूमिका आहे.” असे स्पष्ट केले. दरम्यान, विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची भूमिका घेतली होती. त्यावेळी महाविकास आघाडीचा जो कोणताही उमेदवार असेल त्याच्या पाठीशी आपण उभे राहू. असे म्हटले होते. त्यावर काँग्रेस व राष्ट्रवादीने मात्र कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष व काँग्रेस काय भूमिका घेणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

NCP Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची पहिली यादी जाहीर

मित्र पक्षांमध्ये एकमेकांचे आमदार पाडण्याची लागू शकते शर्यत

तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाल्यानंतर पक्षाच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला असून त्यामुळे ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री अशी भूमिका काँग्रेसमधील काही नेत्यांनी घेतल्याची चर्चा होती. परंतु असे केल्यास मित्र पक्षांमध्ये आपले आमदार जास्त निवडून आणण्यासाठी सहकारी पक्षाचे आमदार पाडण्याची स्पर्धा लागू शकते .असे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले होते. यावर राष्ट्रवादीकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदासाठी अजून पर्यंत फॉर्मुला जाहीर केला नाही.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here