Scheme | १०० रुपयांची गुंतवणूक करा आणि ४ कोटींचा भरघोस फंड मिळवा

0
22
Scheme
Scheme

Scheme |  भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या लक्षात अनेक जण गुंतवणुकीचा पर्याय निवडतात. आताच्या काळात तरूणही भविष्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीच्या मार्गाकडे वळत आहेत. अशातच आता आणखी एक नवीन गुंतवणुकीची संधी उपलब्ध झाली आहे.

विद्यार्थी दशेत असतानाच करिअरमध्ये लवकर गुंतवणूक सुरू करणे ही फार चांगली सवय असून, लवकर आर्थिक नियोजन सुरू केल्यास तितक्याच लवकर आर्थिक उद्दिष्टे साध्य होतात. मार्केट लिंक्ड रिटर्न्स हे नवीन वयोगटातील गुंतवणूकदारांना आकर्षित करत असतात. कारण ते व्याज दर निश्चित केलेल्या हमी परताव्याच्या गुंतवणुकीच्या तुलनेत चांगला परतावा देत असतात.(Scheme)

मागील तब्बल पाच वर्षांमध्ये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे हा गुंतवणूकिचा एक लोकप्रिय पर्याय बनला आहे. तसेच, जर तुम्हाला एसआयपी च्या माध्यमातून पैसे कमवायचे असतील तर दीर्घकालीन धोरण हा एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. तसेच, दररोज जर तुम्ही १०० रुपयांची गुंतवूणूक केली तर काही वर्षातच तुम्ही ४ कोटी रुपयांचा फंड तयार करू शकणार आहात.

Gold scheme | सरकार देतंय सोने गुंतवणुकीची गोल्डन ऑफर

तुम्ही दीर्घ कालावधीसाठी SIP च्या माध्यमातून गुंतवणूक केली तर, तुम्हाला मिळणारा परतावा हा तुमच्या मूळ रक्कमेपेक्षा जास्त आहे. तसेच पुढील प्रमाणे रोज १०० रुपयांची गुंतवणूक केल्यास यातून ४ कोटी रुपयांचा निधी कसा तयार करायचा ते बघूयात… (Scheme)

Scheme | असे आहे गुंतवणूक सूत्र

म्युच्युअल फंडमध्ये ३० वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास त्यावर तुम्हाला अंदाजे १५ टक्के इतका परतावा मिळणार आहे तर यामुळे मोठी रक्कम बचत होऊ शकते. तसेच यातील सर्वात मोठा फायदा म्हणजे चक्रवाढ.

मूळ रक्कम ही प्रत्येक वर्षी बदलत असल्यामुळे, प्रत्येक वर्षी १५ टक्के इतका परतावा तयार करण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे अचूक एसआयपी फॉर्म्युला हा जाणून घेणे, जे एसआयपीमध्ये मूल्य वाढवण्यास मदत करेल. हे सूत्र स्टेप-अप ‘एसआयपी’ म्हणूनही ओळखले जाते. तुम्हाला दरवर्षी १० टक्के स्टेप-अप रेट राखावा लागणार आहे.

जे, तुम्ही ३० वर्षांचे आहात. दररोज १०० रुपये वाचवा व SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात.

Farmers Dron Scheme | केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी योजना; शेतकऱ्यांना देणार ड्रोन

३० वर्ष इतके लक्ष्य गुंतवणुकीचे धोरण ठेवावे. तसेच, दरवर्षी १० टक्के स्टेप-अप करत रहावे.

जर तुम्ही ३,००० रुपयांपासूनच सुरुवात केली तर पुढील वर्षी तुम्हाला ३०० रुपयांनी वाढवावी लागेल.

तसेच तब्बल ३० वर्षांनंतर तुमची मॅच्युरिटी रक्कम ही ४,१७,६३,७०० रुपये इतकी होईल.

SIP च्या कॅल्क्युलेटरनुप्रमाणे, ३० वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक रक्कम ही रु ५९,२१,७८५ इतकी असेल.

येथे ३ कोटी ५८ लाख ४१ हजार ९१५ रुपयांचा भांडवली नफा मिळणार आहे.

अशाप्रकारे, स्टेप-अप फॉर्म्युल्याच्या मदतीने तुमच्याकडे ४ कोटी १७ लाख रुपये इतका निधी जमा होईल.(Scheme)

(टीप – वरील माहिती ही ‘द पॉइंट नाऊ’ हे फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून, आम्ही याद्वारे कुठलाही दावा करीत नाही.)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here