Sarvteerth Taked | शेतकऱ्यांसाठी इकर्डा आणि बायफ संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत चर्चासत्र

0
31
Sarvteerth Taked
Sarvteerth Taked

राम शिंदे – प्रतिनिधी : Sarvteerth Taked |  ‘बायफ विकास अनुसंधान प्रतिष्ठान पुणे’ आणि ‘बायफ इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल लाईव्हलीहूड अँड डेव्हलपमेंट‘ नाशिक, आयोजित आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर एग्रीकल्चर रिसर्च इन ड्राय एरिया (ICARDA) संचलित भारतातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी काटे विरहित ‘निवडुंग’ विकास पर्याय बहुउद्देशीय पीक म्हणून प्रोत्साहन देणे ह्या मथळ्याखाली (दिनांक ९ फेब्रुवारी) रोजी बायफ महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय, पिंपळगाव मोर (ता. इगतपुरी) येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेसाठी भोपाळ येथील ICARDA संस्थेचे डॉ. सुरेंद्र बारपेठे व डॉ. रोहित नामदेव तसेच बायफ उरळीकांचन येथील मुख्य तांत्रिक कार्यक्रम अधिकारी (कृषी) डॉ. विठ्ठल कौठाले, मुख्य कार्यक्रम अधिकारी सुधीरजी वागळे, बायफ महाराष्ट्र मुख्य तांत्रिक कार्यक्रम अधिकारी, जैवविविधता विभाग प्रमुख संजय पाटील यांच्यासह परिसरातील प्रयोगशील आणि संवर्धक शेतकरी उपस्थित होते. एकार्डा संस्था आणि बायफ यांच्या संयुक्त विद्यमाने इगतपुरी तालुक्यातील वासाळी आणि अकोले तालुक्यातील पेंडशेत, देवगाव, शेणीत आणि ढोकरी इत्यादी गावांत ११ पिकांच्या ३५ वाणांचे प्रात्यक्षिक केंद्र उभारणी केली असून, १५ शेतकऱ्यांकडे प्रत्येकी ६ पिकांचे ट्रायल प्लॉट घेतले आहे.(Sarvteerth Taked)

Taked | न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज येथे बारावीचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

या प्रात्यक्षिक व ट्रायल प्लॉटचा उद्देश, आजच्या बदलत्या वातावरणात रब्बी हंगामात येणाऱ्या विविध कडधान्य पिकांची उत्पादनाची शाश्वती, शेतकऱ्यांना मार्गदर्शक तत्वे व भविष्यातील पीक पर्याय उपलब्ध करून देणे असा आहे. या कडधान्ये पिकांमध्ये फावा बिन, मसूर, लाखोली, हरभरा, मूग,उडीद, हूलगा, कडूवाल, गोडवाल, चवळी, वाटाणा, या पिकांच्या विविध वाणांची लागवड करून प्रत्येक पीक वाणनिहाय उत्पादन व बदलत्या वातावरणात तग धरण्याची क्षमता इत्यादी गुणवैशिष्ट्यांवरून या पुढील काळामध्ये पिकांमध्ये बदल करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करुन प्रोत्साहन देणे हा उद्देश आहे.

डॉ. सुरेंद्र बारपेठे यांनी ICARDA संस्थेमध्ये असलेल्या विविध पिकांची आणि पीक उत्पादन पद्धती व साठवणूक, प्रकिया आणि बियाणे निवड इत्यादी गुणवैशिष्ट्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच यापुढे स्थानिक शेतकरी व बायफ संस्था यांच्या मागणीनुसार काही बियाणे उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात जमिनीच्या मगदूरानुसार आणि बदलत्या वातावरणानुसार पीक घेण्यावर भर द्यावा असे सांगितले. सुधीर वागळे मुख्य कार्यक्रम अधिकारी बायफ, नाशिक यांनी बोलताना बायफ संस्थेच्या महाराष्ट्रामध्ये सुरु असलेल्या विविध प्रकल्पांची सविस्तर माहिती देऊन बायफ ची जैवविविधते बाबत असलेली ध्येय-धोरने सविस्तर मांडले.(Sarvteerth Taked)

डॉ. विठ्ठल जी कौठाळे (मुख्य तांत्रिक कार्यक्रम अधिकारी, कृषी विभाग बायफ पुणे), यांनी काटे विरहित निवडुंग शेतकऱ्यांच्या कसे फायद्याचे आहेत, शेतकऱ्यांनी काटे विरहित निवडुंग लावण्याबाबतची ध्येय धोरणे आणि संकल्पना तसेच महत्त्व आणि भविष्यातील याबाबतच्या संधी याविषयी सखोल मार्गदर्शन करून काटे विरहित निवडुंग उत्पादनाची पुढील दिशा स्पष्ट केली. संजय पाटील (मुख्य तांत्रिक कार्यक्रम अधिकारी, जैवविविधता विभाग बायफ पुणे) संजय पाटील यांनी बायफ संस्था आणि निसर्ग केंद्रित विकास प्रकल्प (NPS प्रकल्प) याबाबतची माहिती देताना बायफ संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या जैवविविधता संवर्धन, भरडधान्य संर्वधन आणि अहारातील महत्व, बियाणे बँक, बीजोत्पादन आणि बाजार व्यवस्था इत्यादी घटकांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

Sarvteerth Taked | तंत्रज्ञानाचा उपभोग घेऊन शेती शाश्वत करावी

यावेळी उपक्रमशील शेतकरी बबनराव शेटे यांनी त्यांच्या शेतातील कडधान्य पिके प्रात्यक्षिक केंद्रातील विविध वानांची गुणवैशिष्ट्ये बाबतची माहिती देऊन भविष्यातील ह्या पीक वानांचा प्रचार आणि प्रसार होणे खूप महत्त्वाचे आहे.  जेणेकरून आजच्या बदलत्या वातावरणामध्ये शेती व्यवसायाच्या शाश्वत उत्पादनासाठी,असे मत मांडले
महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विभागीय संशोधन केंद्र इगतपुरी डायरेक्टर हेमंत पाटील यांनी संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास शेतीच्या शाश्वत उत्पादनाची हमी देता येईल व शेतकऱ्यांनी संशोधन केंद्रांसोबत आणि बायफ संस्थेच्या माध्यमातून सर्व तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपभोग करून आपली शेती शाश्वत करावी याबाबत मार्गदर्शन केले.

Taked | टाकेद येथे ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

यावेळी ममताबाई भांगरे, सीड जिनोम सेवियर अवॉर्ड प्राप्त, भारत सरकार, विवेक दातीर, रीड इन्स्टिट्यूट संगमनेर, काशिनाथ जी कोरडे सरपंच वासाळी, श्री.संपतराव वाकचौरे, सेंद्रिय शेती अभ्यासक अकोले तुकाराम गभाले, काशिनाथ खोले, देवचंद चंदर मुठे, परशुराम पदमेरे, सोनाबाई भाऊसाहेब धोंगडे आदी उपक्रमशील शेतकरी आणि कुणाल पुंडे, कृषी अधिकारी बायफ (उरळीकांचन), रामनाथजी नवले, असोसिएट प्रोग्राम मॅनेजर बाएफ,  राजेश कोटकर (असोसिएट प्रोग्राम मॅनेजर बाएफ), राहुल जाधव (कृषी अधिकारी बाएफ नशिक), संजय थेटे, किरण अव्हाड, विष्णू चौखंडे इ.चर्चासत्रासाठी उपस्थित होते.(Sarvteerth Taked)

ह्या एकदिवशीय चर्चासत्र आणि फिल्ड भेटीचे नियोजन जैव विविधता प्रकल्प समन्वयक श्री योगेश नवले आणि संजय थेटे यांनी केलें होते. यावेळी प्रक्षेत्र भेटीमध्ये वासाळी येथील देवचंद चंदर मुठे यांच्या काटे विरहित निवडुंग प्रक्षेत्रावर भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घेतली. त्यानंतर परशुराम हरी पदमेरे आणि ढोकरी येथील बबनराव धोंडीबा शेटे यांच्या प्रक्षेत्रावर जाऊन विविध कडधान्य पीक वाण लागवडी बाबत माहिती घेऊन बियाणे निवड, साठवणूक आणि आहारातील वापर याबाबतचे सखोल मार्गदर्शन उपस्थित शास्त्रज्ञांनी केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here