मुंबई : आजचा शिवसेनेचा दसरा मेळावा हा ऐतिहासिक असणार आहे. कारण यंदा शिवसेनेतील अभूतपूर्व बंडाळीनंतर प्रथमच दोन्ही गटाकडून दसरा मेळावा होणार आहे. त्यामुळेच सर्वाना ह्याची उत्सुकता लागली आहे. तिकडे बीकेसीतील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे आसन लावण्यात आलेले आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यात सध्या ईडीच्या कोठडीत असलेले संजय राऊत यांची खूर्ची लावण्यात आलेली आहे.
यावेळी संजय राऊत यांचे बंधू व आमदार सुनील राऊत यांनी याबद्दल बोलताना म्हटले आहे, सध्या संजय राऊत जरी तुरुंगात असले, तरी ते लवकरच तुरुंगातून बाहेर पडतील. तसेच दरवर्षी दसरा मेळाव्याला संजात राऊत हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशेजारी बसायचे. त्यामुळे यावर्षीही त्यांची खुर्ची व्यासपीठावर असेल, असे सुनील राऊत यांनी सांगितले आहे. तसेच संजय राऊत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना उद्धव ठाकरे किंवा महाराष्ट्र विसरला नाही, असेही सुनील राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.
तसेच सुनील राउत यांनी शिंदे गटावर टीका करत म्हटले आहे, शिवसेनाप्रमुखांची शिवाजी पार्कमधील दसरा मेळाव्याची परंपरा आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली अविरत सुरू आहे. त्यामुळे आम्हाला कोटींच्या जाहिराती किंवा हजारो बसेस भरून कार्यकर्त आणण्याची गरज नाही. त्यामुळे शिवाजी पार्कचे मैदान शिवसैनिकांनी तुडूंब भरले जाईल, असा विश्वास आमदार राऊत यांनी केला आहे.
इकडे ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात संजय राऊतांची खुर्ची लावण्यात आली आहे. यांमुळे ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यासोबत असल्याचा संदेश यापूर्वीही शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात देण्यात आला होता. तर, दुसरीकडे शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरे यांचे आसन ठेवण्यात आले आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम