Sanjay Raut | शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल ह्या कंपनीवर केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता भाजपचे आमदार प्रसाद लाड हे आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. खासदार संजय राऊत यांनी जर यापुढे माझं किंवा माझ्या कंपनीचं नाव घेतलं, तर स्वप्नातले संजय राऊत हे काय आहेत? ते सर्व मी माध्यमांच्या समोर आणेल, असा गंभीर इशाराच यावेळी आमदार प्रसाद लाड यांनी राऊतांना दिला आहे.
तसेच, मी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात तब्बल ५०० कोटींचा मानहानीचा दावा करणार असल्याचा इशाराच आमदार प्रसाद लाड यांनी यावेळी राऊत यांना दिला आहे. दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्यावर बोलताना आमदार प्रसाद लाड हे प्रचंड आक्रमक झालेले असून, खासदार संजय राऊत हे सातत्याने माझा आणि माझ्या क्रिस्टल कंपनीचा चुकीच्या पद्धतीने उल्लेख करत आहेत, असं म्हणत आमदार प्रसाद लाड यांनी संजय राऊतांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
Shivsena News | सुषमा अंधारे आज आमदार कांदेंच्या बालेकिल्ल्यात गरजणार
भाजप आमदार प्रसाद लाड हे पुढे बोलतांना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी राऊत यांना अपशब्द बोलत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “संजय राऊत हा चुXX झालेला आहे. ज्या गोष्टीचा कशाशी काहीही संबंध नाही, कुठल्याही माहितीचा आधार नाही. कशामध्येही कोणाचंही नाव घ्यायचं, आणि कशात नाही घ्यायचं, हेही त्यांना कळत नाही. अशा माणसासाठी हीच संसदीय भाषा वापरली गेली पाहिजे.”
५०० कोटींचा दावा करणार
“मला मिडियाच्या माध्यमातून संजय राऊत यांना सांगायचं आहे की, याच्यापुढे त्यांनी माझं किंवा माझ्या कंपनीचं नाव कुठेही घेतलं, तर स्वप्नातला संजय राऊत काय आहे? हे सगळ मी मीडिया समोर सांगेल. त्यांचे सगळे व्हिडीओ मी लोकांसमोर आणेल व माझ्या वकिलांशी बोलून, मी संजय राऊत यांच्यावर उद्या सकाळपर्यंत किमान २०० ते ५०० कोटींचा अब्रु नुकसानीचा दावाही दाखल करत आहे”, असंही यावेळी प्रसाद लाड हे म्हटले आहेत.
Onion News | भारती पवारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; शेतकऱ्यांची मागणी
“उधळलेला रेडकू असतो ना, त्याला भाल्यानं मारायचं असतं. आणि म्हणून ह्या रेडकुला आता भाल्यानं मारायची वेळ आलेली आहे. त्यामुळे आक्रमकपणा हा आता आलेला आहे. ज्याने मेहनतीने उभं केलेलं साम्राज्य, हे त्याच्या खोटारड्यापणामुळे त्या साम्राज्याला डाग लागत असेल, तर ही छत्रपतींनी दिलेली शिकवण आहे की, ‘अंगावर आलं तर, शिंगावर घ्यायचं”, असंही यावेळी प्रसाद लाड म्हणालेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम