Sanjay Raut : समृद्धी नव्हे हा तर शापित महामार्ग!

0
35
sanjay raut
संजय राऊतांचा अग्निपथ योजनेवरून केंद्र सरकारवर निशाणा

Sanjay Raut : बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर झालेल्या बस अपघातामुळे राज्यात खळबळ माजली आहे. यातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी “समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग झाला आहे तो शापित का झाला याच्या खोलात जावं लागेल” असं वक्तव्य केल आहे.

 

शनिवारी मध्यरात्री झालेला अपघात हा गेल्या वर्षभरात झालेल्या अपघातांपैकी सगळ्यात मोठा अपघात आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल आहे. आज 25 लोक ज्या पद्धतीने मरण पावले हे अतिशय दुर्दैवी आहे. समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग झालाय तो शापित का झाला त्याच्या खोलात जावं लागेल तसेच याबाबत अनेक गोष्टी आहेत त्या भविष्यात समोर येतीलच, पण दुर्दैवाने त्या रस्त्यावर सारख्या होत असलेल्या अपघातांमुळे अनेक मृत्यू झाले आहेत. हे चांगलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

ज्या पद्धतीने तो महामार्ग बनवण्यासाठी सरकारने अनेक गोष्टींमध्ये मनमानी केली, भविष्यात या गोष्टी पुढे येतील. वारंवार घडणाऱ्या अपघातांमध्ये अनेक जण जीवाला मुकत आहेत. श्रद्धांजली किती वेळा वहायची, शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने हडप करण्यात आल्यात त्या शेतकऱ्यांच्या शापामुळेच या महामार्गावर अपघात होत असल्याची टीका खासदार राऊत यांनी केली.

दरम्यान विदर्भ ट्रॅव्हल्स ही खाजगी बस दुपारच्या सुमारास नागपूरहून पुण्याकडे निघाली यात एकूण 33 प्रवासी होते. रात्री दीड वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा येथे हा भीषण अपघात झाला. बस खांबाला धडकली नंतर दुभाजकाला धडकली आणि डाव्या बाजूला पलटी झाल्यामुळे दरवाज्यातून बाहेर पडण्याचा रस्ता बंद झाला आणि प्रवासी बसच्या आतच अडकले. मात्र काही प्रवाशांनी खिडकीच्या काचा फोडून ते बाहेर पडले आणि क्षणातच बसने पेट घेतला, काही वेळात बसच टायर फुटून डिझेलच्या टॅंक ला आग लागली आणि आगीने काही वेळात रौद्ररूप धारण केलं. बस मधून बाहेर पडण्यासाठी प्रवासी धडपडत होते, ओरडत होते मात्र त्यांना बाहेर पडता आलं नाही अग्नी तांडव इतकं मोठं होतं की यात बसमधील प्रवाशांना बाहेर काढणं शक्य न झाल्याने 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर तीन जणांना गंभीर दुखापत झाली असून पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र घडलेली ही घटना अतिशय वेदनादायी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here