Samrudhi highway : समृद्धी महामार्गामुळे कुणाची समृद्धी झाली?

0
43

Samruddhi highway : देवेंद्र फडणवीस यांचा स्वप्न जीवघेणं ठरत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभे मध्ये केले आहे.

तसेच या महामार्गाचे काम तूर्तास बंद करून आधी आवश्यक त्या उपाययोजना करून मग महामार्ग खुला करावा अशी मागणी ही त्यांनी विधानसभेत समृद्धी महामार्गावरील अपघाताबाबत स्थगन प्रस्तावाची सूचना मांडत असताना केले आहे.Samrudhi highway

समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटनांचे प्रमाण वाढतच आहे काही वर्षांपूर्वी झालेल्या या प्रोजेक्टमध्ये शेकडो जणांचे बळी गेले आहेत मागील महिन्यामध्ये बुलढाणा जवळ एका खाजगी ट्रॅव्हल्सच्या अपघातामध्ये 25 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेला महिना उलटत नाही तोच याच महामार्गाचे काम सुरू असताना शहापूर जवळ गर्डन कोसळल्याने कामगारांचा मृत्यू झाला हा समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत Samrudhi highway असल्याने काही काळासाठी हा महामार्ग बंद करा आणि या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करा असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांचा स्वप्न जीवघेणं झाले असल्याची गंभीर टीका काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.Samrudhi highway

विधानसभेमध्ये समृद्धी महामार्गावरील अपघाताबाबत स्थगन प्रस्तावाची सूचना आणण्यात आली यावेळी बोलत होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, समृद्धी महामार्गावर दर दोनशे तीनशे किलोमीटरवर रुग्णवाहिका, फूड प्लाझा असायला हवे होते मात्र अद्याप अशी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र आता त्यात बदल केले जाऊ शकता नुकताच 20 लोकांचा जीव गेला आहे. याबाबत सरकार संवेदनशील आहे की नाही? या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? समृद्धी महामार्गाच्या कामांमध्ये काही त्रुटी आहेत का? असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी महामार्गाचे ऑडिट करून घ्या आणि त्रुटी समोर आल्यास त्यावर उपाययोजना करण्यासाठी काही वेळ समृद्धी महामार्ग बंद करावा अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी सभागृहामध्ये केली आहे.Samrudhi highway

https://thepointnow.in/nitin-desai-suicide/

दरम्यान समृद्धी महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश शासन आणि दिले आहेत. मात्र या महामार्गावर मृत्यू तांडव सुरू असून याला जबाबदार कोण? १०० दिवसांमध्ये जवळपास ९०० जण या महामार्गावर झालेल्या अपघातांमुळे दगावले आहेत. राज्यातील जनतेचा जीव घेऊन जर समृद्धी होत असेल तर त्याचा उपयोग काय?Samrudhi highway याचं उत्तर शासनाने दिलं पाहिजे. या महामार्गावर घडत असलेल्या घटनांना जबाबदार कोण? शासन, प्रशासन की व्यवस्था? हे देखील सरकारने स्पष्ट करावे.

याचबरोबर यापुढे अशा घटना होऊ नये यासाठी सरकार काय उपाययोजना करणार हे देखील सांगावं. समृद्धी महामार्गामुळे कोणाची समृद्धी झाली? यावर देखील सभागृहामध्ये चर्चा होऊ द्या. अशा शब्दात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.Samrudhi highway


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here