Rape Case | ॲपवर ओळख अन्..; शासकीय ठेकेदाराचे महिलेवर अमानुष अत्याचार

0
15
Nashik Crime
Nashik Crime

Rape Case |  छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाली असून, गेल्या दोन महिन्यांतच अंदाजे तब्बल १० प्रकरणं उघडकीस आली आहेत. विशेष म्हणजे यात ६ वर्षांच्या चिमूरडीसह आणखी दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. दरम्यान, आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणातील आरोपी हा एक शासकीय ठेकेदार असून, याच्यासोबत एका डेटिंग ॲपवर ओळख झालेल्या घटस्फोटीत असलेल्या २६ वर्षीय पीडित महिलेवर स्वतःच्या ऑफिसमध्येच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील सिडको भागातील एका नामांकित हॉटेलच्या बाजूलाच असलेल्या ऑफिसमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे यावेळी आरोपी ठेकेदाराने संबंधित पीडित महिलेवर अत्याचार करून तिचे अश्लिल व्हिडीओ आणि फोटो काढले आणि ते व्हायरल करेन असे धमकावत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. आरोपीचे नाव अमोल विठ्ठल पाटील (वय ४०) असे आहे.(Rape Case)

Mumbai | मूल होत नव्हते, म्हणून महिलेने…; हे प्रकरण एकदा वाचाच

नेमकं प्रकरण काय..?

अधिक माहितीनुसार, संबंधित पीडित महिलेने फेब्रुवारी २०२२ मध्ये मुस्लीम धर्मीय मुलासोबत लग्न केले होते. मात्र, त्यांच्यात अनेक मतभेद आणि वाद होत असल्याने एप्रिल २०२२ पासून त्यांचा घटस्फोर झाला आणि ती एकटीच संभाजी नगर शहरात राहत होती. पीडित महिला ही पेशाने शिक्षिका आहे. या काळात महिलेने एका डेटिंग ॲपवर आपले खाते उघडले आणि त्या ॲपवर तिची ओळख संबंधित आरोपी अमोल पाटील याच्याशी झाली. यावेळी त्याने महिलेला तुझा बायोडाटा घेऊन माझ्या ऑफिसला सांगितले.(Rape Case)

Rape Case | लग्नास नकार दिला, म्हणून… 

दरम्यान, यावेळी पीडित महिला ही त्याच्या ऑफिसला गेली असता, तेव्हा त्याने तिला “माझी पत्नी ही मला सोडून नाशिकला राहते आणि मी सध्या माझ्या आईवडीलांसोबत राहतो. तू मला खूप आवडली आणि आपण काही दिवसांनंतर लग्न करू असे विचारले होते. मात्र, तिने त्यावेळी लग्नाला नकार दिला होता. तेव्हा आरोपीने तिच्यावर त्याच्या ऑफिसमध्येच अत्याचार करून तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ घेतले. तसेच, कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकीही दिली होती. (Rape Case)

Reels | पतीने रील्स बनवण्यास विरोध केला अन् पत्नीने पतीला संपवले

घाबरल्यामुळे महिलेने पोलिसांत तक्रार दिली नाही. त्यामुळे त्याने तिला धमकावत वारंवार अत्याचार केले. मात्र, आता नेहमीच्या या अमानुष अत्याचाराला कंटाळत अखेर महिलेने संबंधित एमआयडीसी सिडको पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी अमोल पाटील याच्याकडे पीडितेचे काही अश्लिल फोटो व व्हिडीओ होते. ज्यामुळे तो तिला धमकावत होता. धमकावत त्याने तिच्या वर अनेक वेळा कधी स्वतःच्या कार्यालयात तर, कधी गाडीत वारंवार शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले. तसेच, बेल्टने तो तिला अमानुषरित्या मारहाण करत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.(Rape Case)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here