Maratha Reservation | सदावर्ते पुन्हा मराठ्यांना आडवा; आंदोलनाविरोधात पुन्हा कोर्टात धाव…

0
12

Maratha Reservation |  राज्यात सध्या सगळीकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलनं सुरु आहेत. दरम्यान, याच आंदोलनाविरोधात गुणरत्न सदवर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत मराठा आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या याचिकेवर ८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी २५ ऑक्टोबर पासून दुसऱ्या टप्प्यातील आमरण उपोषणाची हाक दिली होती. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडत आहेत. दरम्यान, आता याच पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोनाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मराठा आरक्षणाविरोधात सदावर्ते यांनी यापूर्वीही याचिका दाखल केली होती. त्यांच्या या याचिकेमुळे मराठा आरक्षण रद्द करण्यात आलं होतं.

सदावर्ते पुन्हा मराठा आरक्षण विरोधात

मराठा आरक्षणाच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याआधी जेव्हा मराठा आरक्षणाचा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा गुणरत्न सदावर्ते यांनी त्याला आव्हान दिलं. पण तरीही उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकलं. पण ते सर्वोच्च न्यायालयात टिकू शकलं नाही. आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलन तीव्र होत आहे. आता पुन्हा आंदोलनाला गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध दर्शवत याचिका दाखल केली आहे.

Deola | खालप येथे मराठा समाजाच्या वतीने लाक्षणिक उपोषण

मराठा समाजावर सातत्याने टीका

मराठा समाजाने आंदोलनाचे हत्यार उपसल्यापासून गुणरत्न सदावर्ते सातत्याने मराठा समाजावर टीका करत आहेत. त्यामुळे मराठा समाज त्यांच्यावर नाराज होता. गुणरत्न सदावर्ते यांना याविरोधात बोलू नका, असा जरांगे पाटील यांनी इशारा दिला होता. त्यानंतर देखील सदावर्ते वादग्रस्त विधान करत आहेत. महाराष्ट्रात हिंसक वातावरण निर्माण करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील जरांगे पाटील यांनी यावेळी दिला होता.

गाडीची तोडफोड

काही दिवसांपूर्वी सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती. त्यांच्या गाडीची तोडफोड करणाऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी केल्याचं समोर आलं होतं. गुणरत्न सदावर्ते व त्यांच्या पत्नी जयश्री पाटील हे मराठा आरक्षण विरोधात याचिका करणारे मुख्य याचिकाकर्ते होते. त्यामुळे मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केल्याचं सांगितलं होतं.

आता पुन्हा सदावर्ते यांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या विरोधात याचिका दाखल केल्यामुळे पुन्हा मराठा समाज गुणरत्न सदावर्तेंविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या याचिकेवरील सुनावणीवमध्ये आता काय होतं, हे जास्त महत्त्वाचं असणार आहे.

Deola | तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश करा; ‘ऊबाठा’ आक्रमक


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here