Rohit Pawar | शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांनंतर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या आमदारांवर ‘इडी अस्त्र’ चालल्याचे दिसत आहे. काल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची कथित बारामती ॲग्रो गैरव्यवहार प्रकरणी तब्बल १२ तास चौकशी झाली. यावेळी स्वतः शरद पवार हे ईडी कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या राष्ट्रवादी कार्यालयात वअसून होते. यावेळी येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. तर, इतक्या वेळ सुरू असलेल्या या चौकशीवरून कार्यकर्ते आक्रमकही झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, काल झालेल्या या बारा तासांच्या चौकशीनंतर रोहित पवारांना आता पुढील तारीख देण्यात आली आहे. आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती ॲग्रो या कंपनीत गैरव्यवहार झाल्या प्रकरणी त्यांची ही ईडीची चौकशी सुरू आहे. तब्बल १२ तासांची ही चौकशी चौकशी संपल्यावर रोहित पवार ईडीच्या कार्यालयाबाहेर आले आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. या जमलेल्या समर्थकांनी रोहित पवारांना थेट खांद्यावर उचलून घेतलं. मोठ्या संख्येने याठिकाणी समर्थकांची गर्दी जमल्याने पोलिस बांदोबस्तही वाढवण्यात आला होता. तर, रोहित पवारांच्या काजत जामखेड मंतदारसंघातूनही मोठ्या संख्येने लोक येथे जमले होते. त्यानंतर रोहित पवारांनी भाषण करत आपली भूमिका मांडली. (Rohit Pawar)
Deola | महसूल विभागाच्या नव्या वाळू धोरणातील लिलाव प्रक्रियेस स्थगिती
१२ तास चौकशी झाली तरी परत १ तारखेला बोलावलं
यावेळी ते म्हणाले की,”आपल्या सर्वांनाकडेच विचारांचा वारसा आहे. आपला मार्ग हा संघर्षाचा आहे. त्यामुळे हा विचारांचा वारसा जपण्यासाठी सर्वांची संघर्षाची भूमिका आहे का?”, असा सवाल यावेळी रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना केला. “आज माझी बारा तास चौकशी झाली आणि तरीही परत मला १ तारखेला बोलावलेलं आहे. तसेच एक तारखेला आणखी माहिती द्यायला सांगितलेले आहे. मी आधी व्यवसायात आलो आणि नंतर राजकारणात आलो. मी आजपर्यंत प्रामाणिकपणे व्यवसाय केला आहे. काही लोकं आधी राजकारणात आले आणि मग नंतर सहजपणे त्यांनी व्यवसाय केला. आम्ही कधी त्यांना प्रश्न विचारले नाहीत. मग त्यांनी आम्हाला का प्रश्न करायचे? असा प्रश्न यावेळी त्यांनी केला.
Rohit Pawar | महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकत नाही
तसेच ते म्हणाले की,”महाराष्ट्र हा कधीही दिल्लीसमोर झुकत नाही आणि कधी झुकणारही नाही. शरद पवार हे युवकांना संधी देत असतात आणि ते अडचणीत असताना साथही देतात. मी ईडीच्या अधिकाऱ्यांना सर्व कागदपत्रे देत आहे. आता पुढील चौकशीसाठी एक फेब्रुवारीला बोलावलं आहे. आपली ही संघर्षाची लढाई सुरुच राहणार असा निर्धारही यावेळी त्यांनी केला. तर, ही चौकशी सुरू असताना काँग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे फोन आले असून, त्यांचे आभार यावेळी रोहित पवारांनी मानले.(Rohit Pawar)
Rohit Pawar | ‘पळणारे नाही, लढणारे दादा’; रोहित पवारांची नेमकी चौकशी का..?
लढणाऱ्यांच्या मागे शरद पवार थांबतात
जेव्हा आपल्या विचाराचा एखादा आमदार हा अडचणीत सापडला. तर, पवार साहेब इथे आले आणि ते बारा तास इथे बसले. यावरून एक गोष्ट समजून घ्या की, पवार साहेब हे युवांना संधी देतात आणि जेव्हा तो युवा अडचणीत येतो. तेव्हा ते त्याच्या पाठिशी बापासारखे खंबीरपणे उभेही राहतात. पवार साहेबांना पळणारी नाही तर, लढणारीच माणसं आवडतात. पळणाऱ्यांच्या मागे नाही, लढणाऱ्यांच्याच मागे शरद पवार थांबत असतात असे यावेळी रोहित पवार म्हणाले.(Rohit Pawar)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम