Rohit Pawar | कथित ‘बारामती ॲग्रो’ गैरव्यवहार प्रकरणी कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी सुरु आहे. मुंबईमधील सक्तवसुली संचलनालयाच्या कार्यलयात रोहित पवार यांना बोलावण्यात आले आहे. तर रोहित पवारांच्या समर्थनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. रोहित पवार यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत शरद पवार स्वत: इडि कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बेलार्ड पियर्स या राष्ट्रवादी कार्यालयात बसून राहणार आहे. दरम्यान, आता या चौकशीत नेमकं काय समोर येईल, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
तर आमदार रोहित पवार यांना ईडी कार्यालयामध्ये सोडण्यासाठी रोहित पवार त्यांच्या आत्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या आल्या होत्या. बारामती ॲग्रोचे कार्यकारी व्यवस्थापक तथा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीने ‘सरकारच्या आणि वरिष्ठ व्यवस्थापनाच्या परवानगीशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होणं हे शक्य नसल्याचा दावा केला आहे. (Rohit Pawar)
Rohit pawar : राष्ट्रवादी फुटीचे पूर्ण खापर अजित दादांवर फोडता येणार नाही…
Rohit Pawar | नेमकं प्रकरण काय..?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार आणि शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांची आज गैरव्यवहार प्रकरणी ईडी चौकशी सुरू आहे. याआधी बारामती ॲग्रो प्रकरणी मुंबई तसेच इतर सहा ठिकाणी ईडीने छापेमारी कोली होती. आमदार रोहित पवार हे बारामती ॲग्रो या कंपनीचे मालक आहेत. सहा कार्यालयांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. मागील वर्षी देखील रोहित पवारांना ईडीने नोटीस बजावली होती. दरम्यान,आता ईडीकडून बारमती ॲग्रो गैरव्यवहार प्रकरणी पवारांची चौकशी केली जात आहे. (Rohit Pawar)
‘कन्नड सहकारी साखर कारखाना’ खरेदी करण्यासाठी एका दुसऱ्या कंपनीला बारामती ॲग्रोने ‘कॅश क्रेडिट अकाउंट’च्या माध्यमातून तब्बल ५ कोटींची रक्कम दिल्याचे सांगितले जात आहे. त्याबरोबरच साखर कारखान्याचीही बोली लावण्यास सांगितल्याचा दावा ईडी कडून न्यायालयात करण्यात आला आहे. ही ५ कोटींची रक्कम बारामती ॲग्रोकडून खेळते भांडवल म्हणून कर्ज स्वरूपात मंजूर करण्यात आलेली होती. तर, बारामती ॲग्रो कंपनीने कर्जापोटी मिळालेली रक्कम ही दुसऱ्याच कारणासाठी वापरल्याचा दावाही ईडीने केला आहे.
Mamta Banerjee | निवडणुकांच्या आधीच विरोधकांचा गट फुटला..?
पळणारे नाही तर, लढणारे दादा
दरम्यान, ईडी चौकशीला जाण्याआधी रोहित पवारांनी आपले आजोबा शरद पवार यांचे आशिर्वाद घेतले होते. यावेळी शरद पवारांनी त्यांना यशवंतराव चव्हाण यांचे ‘कृष्णाकाठ’ हे पुस्तक दिले. शरद पवार हे ईडी कारीलयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात बसून आहेत. तर, मुंबईत जागोजागी रोहित पवारांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली आहे. यातून अजित पवारांवर निशाणा साधण्यात आला आहे. या बॅनरवर “पळणारे नाही तर, लढणारे दादा” अशा आशयाचे बॅनर जागोजागी लावण्यात आले आहे. (Rohit Pawar)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम