Doctors Strike | सरकारकडून आश्वासनांचे गाजर; निवासी डॉक्टर संपावर

0
37
Doctors Strike
Doctors Strike

Doctors Strike |  निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने आता निवासी डॉक्टरांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. अनेकदा पाठपुरवठा करूनही फक्त आश्वासन देत असून, कोणतीही कार्यवाही करत नसल्यामुळे राज्यभरातील निवासी डॉक्टर हे आता संपावर जाणार आहे. या संपत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निवासी डॉक्टर देखील सहभागी होणार आहेत. याबाबत त्यांच्याकडून एक अधिकृत पत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

येथील निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ या संघटनेच्या वतीने हे पत्रक काढण्यात आले असून या पत्रात म्हटले आहे की, “गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील निवासी डॉक्टरांचे अनेक समस्या आणि प्रश्न प्रलंबित आहेत. तसेच मागील एक वर्षभरात मध्यवर्ती मार्ड संघटनेने वेळोवेळी याबाबत सरकारकडे पाठपुरवठा केला आहे. मात्र, प्रत्येकवेळी सरकारने फक्त आश्वासनांचे गाजर दाखवले. प्रत्यक्षात मात्र कोणतीही दखल घेतलेली नाही.(Doctors Strike)

Chhagan Bhujbal | अन् सर्वांनीच भुजबळांना तोंडावर पाडलं

दरम्यान, मार्ड संघटनेने ७ फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजेपासून या संपाचा इशारा दिला आहे. यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व निवासी डॉक्टर हे संपावर जाणार आहेत. या संपामुळे होणाऱ्या रुग्णांच्या सेवेवरील परिणामांसाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तरी संपाच्या काळातही सर्व अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यात येणार असल्याचे निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

Doctors Strike | दुसरा पर्याय नाही…

निवासी डॉक्टरांच्या मध्यवर्ती मार्ड संघटनेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, “निवासी डॉक्टरांना मिळणारे त्यांचे हक्काचे विद्यावेतन हे त्यांना कधीच वेळेत दिले जात नाही. अनेक महिन्यांपासून विद्यावेतन हे थकीत असल्यामुळे, निवासी डॉक्टरांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत आहे. निवासी डॉक्टरांसाठी पुरेसे हॉस्टेल्सही उपलब्ध नाहीत.(Doctors Strike)

त्यामुळे दोन ते तीन डॉक्टरांना एकाच खोलीत अडचणीत राहावे लागते. आम्ही आमच्या मागण्या या वेळोवेळी प्रशासनासमोर मांडल्या असून, दरवेळी प्रशासनाने फक्त तोंडी आश्वासनाचे गाजरच दाखवले. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे आमच्यापुढे आता संपावर जाण्याशिवाय दुसरा पर्याय” नसल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.

Vinod Kumavat | ‘झुमका वाली पोर’ फेम अभिनेत्यावर बलात्काराचा गुन्हा

अशा आहेत डॉक्टरांच्या मागण्या 

१. निवासी डॉक्टरांना देण्यात येणारे विद्यावेतन हे प्रत्येक महिन्याला दहा तारखेपर्यंत त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जावे.

२. निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा वासतिगृहांची व्यवस्था केली जावी. (Doctors Strike)

३. निवासी डॉक्टरांना देण्यात येणारे विद्यावेतन हे केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे असावे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here