Rep in India: आईसमोरच केले नग्न… पॉलिथीन टाकून वाचवली इज्जत


Rep in India: देशात मोठ्या प्रमाणात नराधमांचे क्रूर कृत्य दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. महिला देशात सुरक्षित आहेत का प्रश्न नेहमीच समोर येत राहतो. तेलंगणातील हैदराबादमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेला रस्त्याच्या मधोमध शिवीगाळ करताना एका व्यक्तीने विवस्त्र केले. त्याचवेळी ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हैदराबाद पोलिसांनी आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीची चौकशी करण्यात आली असून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. त्याचबरोबर या घटनेबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. (Rep in India)

Narayn rane: ‘अरे बैठ नीचे… औकात नहीं है’, नारायण राणेंचा तोल गेला

ही घटना हैदराबादच्या जवाहर नगर भागातील आहे. पीडित मुलगी रविवारी रात्री कपड्याच्या दुकानातून घरी परतत असताना रात्रीचे आठ वाजले होते. यादरम्यान आरोपीने येऊन तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तरुणाने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप महिलेने केला आहे. मात्र, पीडितेने यावर पूर्ण आक्षेप नोंदवला आणि तिने त्याचा सामना केला. यावेळी आरोपीने तिचे कपडे फाडून तिला नग्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक केली

त्याचवेळी रस्त्याने जाणाऱ्या महिलांनी पुढे येऊन वर्तुळ तयार करून निळ्या प्लॅस्टिकच्या कापडाने झाकले. दरम्यान कोणीतरी याबाबत पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपी महिलेसोबत गैरवर्तन करत असताना त्याची आई तिथे उपस्थित होती, असे सांगण्यात येत आहे. पण, ती शांतपणे उभी राहिली आणि तिने आपल्या मुलाला रोखण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. यामुळे महिला म्हणून तिचे कृत्य निंदनीय असल्याचे उपस्थितांनी केले.

विविध कलमान्वये गुन्हा दाखल

पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम 354 (बी), 323, 506 आणि इतर कलमांसह वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेसंदर्भात पीडितेचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. त्याचबरोबर या घटनेबाबत रस्त्यावर उपस्थित लोकांकडूनही माहिती गोळा करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!