Skip to content

पासष्ट वर्षीय महिलेवर बलात्कार; देवळा शहरात माणुसकीला काळीमा


देवळा : मोबाईल चार्जिंग करण्याच्या बहाण्याने गुंजाळनगर येथील बावीस वर्षीय तरुणाने मंगळवार (दि.९) रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास परिसरातील एका साठ ते पासष्ट वर्षीय महिलेला इजा करत बलात्कार केला. या घटनेबाबत देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिली . आरोपीला आज बुधवार (दि.१०) रोजी कळवण न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे .
गिरणा नदीकाठावरील गावांचा वाळू उपशाला विरोध कायम ;आजच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमुखी निर्णय
याबाबत देवळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुंजाळनगर ता.देवळा येथील ज्येष्ठ महिला घरात एकटी असताना संशयित आरोपी सागर बुवाजी तलवारे (वय २२) रा.गुंजाळनगर हा मोबाईल चार्जिंग करण्याच्या बहाण्याने घरात घुसला आणि घराचे दार बंद करून घेतले. सदर महिलेचा गळा दाबत डोके भिंतीवर आदळून फिर्यादीच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर व डोक्याला दुखापत करत जबरदस्ती केली. या झालेल्या प्रकाराबद्दल कोणाला काही सांगितले तर मारून टाकण्याची धमकी देत सदर महिलेचा पाचशे रु.किमतीचा मोबाईल घरातून घेत पळून गेला. पोलीस निरीक्षक समीर बारवकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले .

सदर आरोपीस ताब्यात घेऊन अटक केली. त्यास बुधवारी कळवण न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे, ज्योती गोसावी आदी करीत आहेत. एका निष्णात महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून आरोपीला कडक शासन व्हावे ,अशी मागणी करण्यात आली आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!