Skip to content

Ram Mandir | रामलल्ला आता तंबूत नाही, दिव्य मंंदिरात राहतील – पं. नरेंद्र मोदी

Ram Mandir

Ram Mandir |  आज अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि राम लल्लाच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. या पूजेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ दिवसांचे कडक अनुष्ठान केले होते. आज भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला. दरम्यान, यावेळी नरेंद्र मोदी यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी ते भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले. (Ram Mandir)

यावेळी बोलताना ते म्हणाले की, “आता आमचा राम तंबूत राहत नाही. तर, भव्य दिव्य मंदिरात विराजमान झालेले आहेत. या शुभ दिनाच्या सर्व देशवासीयांना अनंत शुभेच्छा. खूप काही सांगण्यासारखं आहे. पण आता कंठ नि:शब्द झाला आहे. माझं शरीर हे अजूनही स्तब्ध आहे. चित्त अजूनही त्याच क्षणात लीन आहे. आमचे रामलल्ला आता तंबूत राहत नाही. आमचे रामलल्ला आता या दिव्य मंदिरात राहतील”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

Ram Mandir | जिथे मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता, तिथेच बांधले आहे – योगी आदित्यनाथ

तसेच पुहे ते म्हणाले की,“मला पक्का विश्वास आहे. अपार श्रद्धा आहे की, जे झालं त्याची अनुभती या विश्वाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक रामभक्ताला झाली आहे. आताच हा क्षण खूप पवित्र आहे. येथील हे वातावरण, ही ऊर्जा, ही घडी प्रभू श्रीरामांचा आपल्या सर्वांवर आशीर्वाद आहे. २२ जानेवारी २०२४ चा आजचा हा सूर्य एक अद्भूत दिवस घेऊन आला आहे. आजची ही तारीख ही फक्त कॅलेंडरवरील तारीख नाही. तर, एका नव्या काळाचा नव्या पर्वाचा उगम आहे”, असा विश्वासदेखील यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.(Ram Mandir)

Ram Mandir | काय म्हणाले नरेंद्र मोदी ?

लोकार्पण सोहळ्याच्या वेळी भाषणात बोलताना, “आज आपले राम आलेले आहेत. कित्येक शतकांच्या प्रतिक्षेनंतर आज आपले राम आले आहेत. या शतकांच्या अभूतपूर्व धैर्य आणि अगणित बलिदान, त्याग व तपस्येच्या नंतर आपले प्रभू राम आज आले आहेत. या शुभ प्रसंगाचे आपल्या सर्वांना आणि संपूर्ण देशाला अभिनंदन”. (Ram Mandir)

Ram Mandir | प्राण प्रतिष्ठेपूर्वी मोठी बातमी..! श्रीरामांच्या शोभा यात्रेवर दगडफेक

“आताच मी गर्भ गृहात ईश्वरीय चेतनेचा साक्षीदार बनून तुमच्यासमोर येथे उपस्थित झालेलो आहे. याठिकाणी अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पण आता कंठ दाटून आला आहे. माझे शरीर हे अजूनही स्पंदीतच आहे. मन अजूनही त्याच क्षणात लीन आहे. आपले राम लल्ला आता टेंटमध्ये राहत नाही. तर, आपले राम लल्ला आता भव्य आणि दिव्य मंदिरात राहतील. माझा पूर्ण विश्वास आहे आणि अपार श्रद्धा आहे. जो घटीत झालेला आहे. त्याची अनुभूती ही देशातील तसेच विश्वाच्या प्रत्येक कोपऱ्यातील रामभक्तांना होत असेल. राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या नंतरचा प्रत्येक दिवस हा संपूर्ण देशात उमंग व उत्साह वाढवणारा होता”, अशा भावनाही यावेळी नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.(Ram Mandir)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!