Rajyasabha Eelection | महायुतीचे दोन नवे खासदार..!; दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड

0
101
Rajyasabha Eelection
Rajyasabha Eelection

Rajyasabha Eelection |  लोकसभा निवडणुकीत भाजपचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर त्यांची राज्यसभेतील पदं ही रिक्त झाली होती. या राज्यसभेतील दोन रिक्त पदांसाठी निवडणूक (Rajyasabha Eelection 2024) पार पडली आणि या दोन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. यापैकी एक जागा भाजपने तर एक जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला आली होती.

नुकतेच शेकापमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार धैर्यशील पाटील (Dhairyasheel Patil) यांना भाजपकडून राज्यसभेवर पाठवण्यात आले असून, अजित पवारांनी आपला शब्द पाळत साताऱ्याच्या नितीन पाटील (Nitin Patil) यांना राज्यसभेवर पाठवले असून, या दोघांची बिनविरोध निवड झाली आहे. या जागांसाठी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासह आणखी दोन अपक्ष उमेदवारांकडूनही अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र, अर्ज पडताळणीदरम्यान या दोन्ही अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने अजित पवार गटाचे नितीन पाटील आणि भाजपच्या धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड झाली. (Rajyasabha Eelection)

Rajyasabha Candidate | भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर

Rajyasabha Eelection | कोण आहेत अजित पवारांचे नवे खासदार 

लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाई येथील सभेत नितीन पाटलांना भर सभेत शब्द दिला होता. जर, साताऱ्याच्या जागेवर महायुतीच्या उमेदवाराचा विजय झाला. तर, नितीन पाटील यांना मी खासदार करतो, असा शब्द यावेळी अजित पवारांनी दिला होता. त्यानंतर ‘दादा आपला वादा’ कधी पूर्ण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. दरम्यान, राज्यसभेची एक जागा अजित पवारांनी नितीन पाटील यांना राज्यसभेवर पाठवत आपला शब्द पाळला आहे. नितीन पाटील यांचे बंधु वाईचे आमदार आहेत. त्यांचे वडील खासदार राहिलेले आहेत. तर, ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. (Rajyasabha Eelection)

Sunetra Pawar | अखेर दादांनी पत्नीला संसदेत पाठवलंच; सुनेत्रा पवार झाल्या खासदार

शेकापचे प्रदेशाध्यक्ष भाजपचे नवे खासदार 

दुसरीकडे भाजपकडून धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. धैर्यशील पाटील हे मूळचे रायगड जिल्ह्यातील असून, ते माजी आमदार आहेत. त्यांच्यावर रायगड जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. या एका जागेसाठी भाजपतील अनेकजण इच्छुक होते. यात पुनम महाजन, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि स्मृति इराणी यांचीही संधी हुकल्याचे बोलले जात आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here