Landslide in raigad : रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळली. या घटनेनं क्षणात होत्याचं नव्हतं झालं. पन्नास ते साठ घरांची वस्ती असलेल्या या गावात घरांवर दरड कोसळली. या घटनेत 120 ते 130 लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. त्यापैकी 75 जणांना वाचवण्यात यश आलं आहे, तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे. इशाळवाडीच्या या घटनेनं पुन्हा एकदा माळीण आणि तळीये गावातील दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती.
दरम्यान, गुरुवारी पहाटेपासून आत्तापर्यंत इथं अविरतपणे बचावकार्य सुरु होतं. पण आता हे बचावकार्य तात्पुरतं थांबवण्याचा निर्णय एनडीआरएफनं घेतला आहे. या परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरु असल्यानं हे बचावकार्य थांबवण्यात आलं आहे. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ९३ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहेत.
https://thepointnow.in/violence-increased-in-manipur/
रायगडच्या चौक-मानवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या इर्शाळवाडी या आदिवासी बांधवांच्या वस्तीवर दरड कोसळल्याची घटना १९ जुलैला रात्री घडली. या दुर्घटनेमध्ये गावातली जवळपास 50 हुन अधिक घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. रायगड जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे ही दुर्घटना घडली आहे. इर्शाळवाडी हे दुर्गम ठिकाण असल्याने त्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्यासाठी आवश्यक असणारी जेसीबी सारख्या मशनरी घटनास्थळी पोहोचविण्यासाठी मोठ्या प्रमावर अडथळे येत आहेत. त्यातच मुसळधार पाऊस होत असल्याने या ठिकाणच्या बचाव कार्यात मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होऊन बचाव कार्य काही काळासाठी थांबविण्यात आल आहे.
राज ठाकरे संतापले
रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे असं सांगण्यात येत आहे. ह्यातून लोकं सुखरूप बाहेर पडावीत इतकी इच्छा. जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्याकडून काय मदत मिळेल हे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जरूर पाहावं. खरंतर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती, पण आत्ता इतकंच सांगतो की कुठे दरड कोसळू शकतात ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? असो. पुढे ह्यावर सविस्तर बोलेन पण आत्तातरी सगळे सुखरूप राहावेत हीच इच्छा.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम