गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत शिवसेनेवर टीका केली होती. गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिंदूत्त्वाचा मुद्दा पेटला असतानाच, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता मनसेला निशाणा साधला आहे.
राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी भायखळा येथील राणीबागेतील कार्यक्रमात बोलत होते. राज ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रत्युत्तर दिले.शिवसेनाही आयोध्येला जाणार असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळीही त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल सुरू.
शिवसेना अनेक वर्षांपासून हनुमान जयंती साजरी करत आल्याचे नमुद केले. राज ठाकरे यांची पावले पडत पाहताच शिवसेना खडबडून जागी झाली आहे. आदित्य ठाकरे यांनी चार वर्षांत रंग बदलल्याने हिंदुत्व येत नाही. हिंदुत्व आपल्या मनात आणि रक्तात आहे. आम्हाला कोणाकडून हिंदुत्व शिकण्याची गरज नाही, अशा शब्दांत मनसेचे नाव न घेता टोला लगावला. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यातून शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी करण्यात येत आहे.
राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलाचं तापलं आहे. आदित्य यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याची माहिती माध्यमांना दिली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आदित्य ठाकरे आयोध्येला जाणार आहेत. शिवसेनेची पुढीची भूमीका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. तर दौरा यशस्वी करण्याची जबाबदारी नाशिकमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम