Maratha Reservation | मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना भेटून सांगितलं होतं असं आरक्षण कधीही मिळणार नाही. मुळात जरांगेंच्या मागे कोण आहे, कोण त्यांना हे बोलायला सांगत आहेत, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे असे जातीय तणाव निर्माण होत आहेत, ह्यामागच गूढ लवकरच समोर येईल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत. मुंबईत राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली, यात त्यांनी अनेक विषयावर आपली मत परखडपणे मांडली. यावेळी ठकरेंची तोफ सरकारवरही कडाडली.
शरद पवारांवर हल्लाबोल –
जात ही गोष्ट अनेक जणांना प्रिय असते, स्वतःच्या जातीबद्दल अभिमान असणे हे आधीही होत होते महाराष्ट्रात, पण दुसऱ्यांच्या जाती बद्दल द्वेष निर्माण करणे हे राष्ट्रवादीच्या जन्माच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुरू झाले. यांच्या स्वार्थापायी आपण महाराष्ट्र खड्ड्यात घालतोय, माझ्यासाठी माझ्या मराठी माणूस महत्त्वाचा, मी जात पात ही मानत नाही, माणसांना महत्त्व देतो, असे म्हणत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा अस्पष्टपणे शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
देवळा बाजार समितीचे माजी संचालक जिभाऊ शिंदे यांचे निधन
राज ठाकरेंचा सरकारला इशारा
हवा व ध्वनिप्रदूषणामुळे कोर्टाने दिवाळीत फटाके वाजण्याबाबत निर्देश दिलेले होते. त्यावर राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. फटाके कधी वाजवायचे, सण कधी आणि कसे साजरे करायचे हे पण कोर्टच ठरवणार का? असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला. मराठी पटयांसंदर्भात आम्ही मुद्दा घेतला तेव्हाही व्यापारी कोर्टात गेले, हे जातातच कसे ? पण सरकारमधून काही हालचालीही होत नाहीत. कदाचित आम्हालाच आता हात पाय हलवावे लागतील, असा इशाराच राज ठाकरेंनी यावेळी सरकारला दिला आहे.
काय म्हणाले जरांगे..?
मराठ्यांच्या आंदोलनामागे कोण आहे? हे राज ठाकरेंनीच शोधून काढावे, असं प्रत्युत्तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंना दिलं आहे. जरांगेंना भेटून सांगितलं होतं की असं कोणतंच आरक्षण मिळणार नाही. मनोज जरांगे यांचा बोलवता धनी कोण? निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जातीय तणाव कोण निर्माण करतंय? असे राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले होते.
त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलं आहे. जातीय तेढ निर्माण करण्यामागे कोण हे राज ठाकरेंनी शोधावं, असंदेखील यावेळी मनोज जरांगे म्हणाले आहे. मनोज जरांगे यांचा दौरा आज पुणे जिल्ह्यातील दौंड या गावात आहे.
Malegaon | हिरेंचा रात्रभर मुक्काम पोलिस ठाण्यात; पोलिस ठाण्याभोवती समर्थकांचा गराडा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम