Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंनी आज चिपळूणमधील पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले. दारू आणि मटणासाठी निवडणुका लढवायच्या का? अशा शब्दात राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संतप्त सवाल केला. येत्या १५ दिवसांत राज ठाकरे विविध ठिकाणी मेळावे घेणार आहेत. त्यासोबतच राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर ते भाष्य करणार आहेत.
Coal Scam: माजी खासदार विजय दर्डा कोळसा घोटाळ्यात दोषी
पदाधिकाऱ्यांना पक्ष सांगेल ते काम करावे लागेल. अन्यथा त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागणार, अशा शब्दांत त्यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.
कार्यकर्त्यांनी शाखा नव्हे तर नाका उभा करा, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवा. महाराष्ट्रावरचे प्रेम कमी होऊ देऊ नका. तुमच्यातला राग कमी होऊ देऊ नका, राज्यासाठी लढले पाहिजे, राज्यातील लोकांवर प्रेम करा, पक्ष नव्हेतर कुटुंब म्हणून काम केले पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.
तसेच लोकसभेची निवडणूक का लढवायची? दारु, मटणासाठी निवडणुका लढवायच्या का? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
Blood letter : राजकीय अस्थिरता नको महिला अत्याचारावर चर्चा करत त्या तरुणाने लिहिलं रक्ताने पत्र
पक्षाच्या मोर्चेबांधणी निमित्त राज ठाकरे यांनी कोकण दौरा आखला आहे. चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर राज ठाकरे दापोलीला जाणार आहेत. चिपळूणमध्ये राज ठाकरेंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम