Rahul Gandhi | ४९ लाखांचं देणं, स्वतःचं घरही नाही; राहुल गांधींची संपत्ती किती?

0
21
Rahul Gandhi
Rahul Gandhi

Rahul Gandhi |  देशभरात आगामी लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, ज्या जागांवरील उमेदवार जाहीर झाले आहेत. त्यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, यावेळी येथे राहुल गांधी यांच्या भव्य असा रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या या रोड शोमध्ये त्यांची बहिण प्रियंका वाड्रा यादेखील उपस्थित होत्या.

दरम्यान, निवडणूक अर्ज भरताना त्यांनी निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे सद्यस्थितीला ५५,००० रुपये रोख रक्कम आहे. तर, या आर्थिक वर्षात त्यांचे एकूण उत्पन्न हे १ कोटी २ लाख ७८ हजार ६८० रुपये इतके होते. याशिवाय राहुल गांधी यांच्याकडे एनएसएस, पोस्टल सेव्हिंग व इन्शुरन्स पॉलिसीमध्ये सुमारे ६१.५२ लाख रुपये आहेत.(Rahul Gandhi)

Rahul Gandhi | गांधी परिवाराच्या उपस्थितीत ‘मविआ’ शिवतीर्थावर रणशिंग फुंकणार

Rahul Gandhi | पाच वर्षात ५ कोटींची वाढ 

राहुल गांधी यांच्याकडे एकूण जंगम मालमत्ता ही ९ कोटी २४ लाख ५९ हजार २६४ रुपये आहे. तर. एकूण स्थावर मालमत्ता ही सुमारे ११ कोट १४ लाख २ हजार ५९८ रुपये इतकी आहे. अशी राहुल गांधींचे एकूण संपत्ती ही  २० कोटी ३८ लाख ६१ हजार ८६२ रुपये आहे. मात्र, तरीही त्यांच्यावर सुमारे ४९ लाख ७९ हजार १८४ रुपयांचे देणं आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी राहुल गांधी यांनी २००४ मध्ये आपली पहिली निवडणूक लढवली होती, त्यावेळी त्यांची एकूण संपत्ती ही ५५ लाख रुपये इतकी होती. तर, मागील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची एकूण संपत्ती ही सुमारे १५ कोटी असून, त्यावेळी त्यांच्यावर ७२ लाखांचं कर्ज होतं. त्यामुळे या पाच वर्षात त्यांच्या संपत्तीत ५ कोटींची वाढ झाली आहे.(Rahul Gandhi)

Rahul Gandhi | नशिक कोर्टाने ठोठावली राहुल गांधींना नोटिस

यंदाही त्याच मतदार संघातून निवडणूक लढवणार 

राहुल गांधी यांनी गेल्या निवडणुकीत २०१९ मध्ये अमेठी व वायनाडमधून निवडणूक लढवली होती. सुरक्षित मतदार संघ म्हणून त्यांनी त्यावेळी वायनाड मतदारसंघाची निवड केली होती. अमेठीत भाजपच्या स्मृती इराणींकडून त्यांचा पराभव झाला. मात्र, सुरक्षित मतदार संघ असलेल्या वायनाडने त्यांना वाचवले आणि येथून ते मोठ्या मताधिक्याने निवडूनही आले. दरम्यान, त्यामुळेच त्यांनी यावेळी आता दुसऱ्या टर्मसाठीही वायनाडमधूनच निवडणूक लढवणार आहे. तर, त्यांच्याविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांच्या पत्नी ऍनी राजा या उभ्या आहेत.  (Rahul Gandhi)

राहुल गांधींकडे स्वतःचं घर नाही

विशेष म्हणजे या प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार राहुल गांधींकडे स्वतःच्या मालकीचे घर नाही. पण गुरुग्राममध्ये त्यांकच्या 9 कोटींच्या दोन कमर्शियल बिल्डिंग आहेत.(Rahul Gandhi)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here