पंजाबमधले शिवसेना कार्यकारी प्रमुख हरिश सिंगला यांना अटक

0
29

सध्या राजकीय वर्तुळात शिवसेने विरुद्ध चांगलीच खळबळ माजली आहे. नुकताच नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरावर हनुमान चालीसा पठण मुद्द्यावर मोठा वाद सुरु होता. सैनिकांनी आक्रमक होऊन विजय मिळवला. आता दुसरीकडे पंजाबमधल्या पटियाला भागात काल शिवसेना आणि शीख संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. यात एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला होता. या धक्कादाय घटनेनं शिवसेना नेते हरिश सिंगला यांना अटक करण्यात आली आहे.

शिवसेनेचे पंजाबमधले कार्यकारी प्रमुख हरिश सिंगला यांच्या नेतृत्वाखाली काल खलिस्तान मुर्दाबाद मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी काही खलिस्तान समर्थक या मोर्चाच्याला आडकाठी करण्यासाठी आले होते. त्यावेळी श्री काली देवी मंदिरासमोर हे दोन्ही गट आमने-सामने आल्याने वातावरण तणावपूर्ण झालं. मोर्चाच्या विरोधात काही शीख युवकांनी शिवसैनिकांना माकड सेना असं खोचक शब्दात संबोधत जोरदार मुर्दाबादच्या घोषणा देऊ लागले.

दोन्ही घटनांमध्ये बघता-बघता हाणामारी सुरू झाली आणि काही मिनिटातच यानंतर मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली, तसंच काहींनी तलवारीने हल्लाही केला. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला. या सगळ्या घटनेनंतर पटियाला इथं संचारबंदी लागू करण्यात आली होती. आता आज या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पंजाबमधले कार्यकारी प्रमुख हरिश सिंगला यांना अटक करण्यात आली आहे. आता परिस्थिती शांत झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here