Pune PMPML Bus | पुणे बससेवेत प्रवाशांसाठी नवीन सुविधा, प्रवाशांची काळजी मिटली

0
24

पुणे : (Pune PMPML Bus) पुणे शहर बससेवेत वेगवेगळ्या सुधारणा केल्या जात आहेत. आता यात आणखी एक नवीन सुविधा सुरु करण्यात येत आहे. प्रवाशांना या सुविधेमुळे उत्तम फायदा होणार आहे.या सुविधेमुळे प्रवाशांना आता खिशात पैसे ठेवण्याची गरज पडणार नाही.महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (PMPML) बस सेवेने कात टाकली असताना पुणेकरांसाठी पीएमपीएमएलने नवीन बसेसची सुविधा आणली आहेत. विना कंडक्टर बससेवा सुरु केलेली आहे. चालक,वाहकांना शिस्त लावण्यात आलेली आहे. PMPML चे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी स्वतः बसमधून अचानक प्रवास केला आणि त्यावेळी त्यांनी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी संवाद साधत प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या.PMPML चे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी अधिकाऱ्यांना शनिवार आणि रविवारी बसमधून प्रवास करण्याचे आदेश दिले. आता आणखी एक सुविधा पीएमपीएमएलने रविवारी १ ऑक्टोंबरपासून सुरु केली आहे. त्यामुळे प्रवाशांना खिशात पैसे ठेवण्याची गरज पडणार नाही.
श्री रामराव आहेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने लवकरच मोबाईल बँकिंग सुविधा – शिंदे

सुविधा नक्की काय ?
पुणे शहरातील पीएमपीएमएलच्या बससेवेत आजपासून कॅशलेस तिकिटाची सुविधा सुरु करण्यात आली आहे. PMPML बसमध्ये ऑनलाईन पेमेंटद्वारे तिकीट काढता येईल. रविवारी( दि.01ऑक्टोबर 2023) सकाळपासून ऑनलाईन तिकीट सेवा सुरू करण्यात आली आहे. आता UPI QR कोड स्कॅन करून तिकिटांचे पैसे देता येणार आहे. तसेच गुगल पे, फोन पे यासारख्या पेमेंट अ‍ॅपचा वापर करून तिकीट काढता येईल. आता पुणेकरांना पीएमपीएमएलचे तिकीट कॅशलेस पद्धतीने काढता येणार आहे.

पुणे शहर बसमधील ऑनलाईन तिकीट सेवेची आधी चाचणी घेण्यात आली. 16 ते 30 सप्टेंबर दरम्यान बाणेर डेपो अंतर्गत चाचणी  घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर पुणे शहरातील सर्व बससेवेत हा प्रयोग राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या बससेवेमुळे पुणेकर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. विना कंडक्टर धावणाऱ्या बसेसनंतर आता ऑनलाईन तिकीट प्रणाली PMPML ने सुरु केल्यामुळे पुणेकर सार्वजनिक वाहतूक सेवेचा अधिक  फायदा होणार आहे.

Ajit pawar: भाजप मधल्याच काही लोकांना अजित पवार मुख्यमंत्री म्हणून नको आहेत काय ?

यामुळे प्रवासी आणि कंडक्टर वाद थांबणार
सुट्या पैशांवरुन प्रवाशी आणि कंडक्टर यांच्यात अनेकदा वाद होत असतात. पण आता ऑनलाईन तिकीट सुरु केल्यामुळे हे वाद थांबणार आहेत. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सेवेचे उद्घाटन केले. या सेवेमुळे खिशात पैसे नसताना देखील बसमधून प्रवास करता येणार आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here