Pune News | विधानसभा निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेला काहीच तास शिल्लक असून कालपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यात राज्यभरात राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते आणि नेत्यांवर हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहे. अशातच पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांच्या पतीवर अज्ञातांकडून भरदुपारी हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांच्या गाडीच्या काचा दगड मारून फोडण्यात आल्या असून यादरम्यान, टिंगरे जखमी झाले आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
Political News | ‘बविआ’चा उमेदवार फुटला?; सहा तास राडा घालून अखेर हितेंद्र ठाकूर तावडेंसोबत रवाना
नुकताच शरद पवार गटात केला होता प्रवेश
आज दुपारी अडीजच्या सुमारास विश्रांतीवाडी परिसरात ही घटना घडली असून चंद्रकांत टिंगरे हे माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती आहेत. मागच्याच आठवड्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला असून शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडला होता. ते वडगाव शेरी मतदार संघाचे उमेदवार बापूसाहेब पाठारे यांना पाठिंबा दिला आहे.
नेमके काय घडले?
चंद्रकांत टिंगरे व त्यांचा कारचालक सचिन गायकवाड दुपारच्या सुमारास एम.एस.सी.बी ऑफिसच्या दिशेने निघाले होते. गाडी बाजूला थांबवत खाली उतरले असता दुचाकी वरून आलेल्या अज्ञातांनी पहीले पाठीमागून कार वर दगडफेक केली. यावेळी कारचालक घाई घाईने उतरत पाठीमागे गेला. त्याच वेळी समोरून देखील काचेवर दगड मारून तोडफोड करण्यात आली. या दगडफेकी चंद्रकांत टिंगरे हे जखमी झाले आहेत. या घटनेमुळे वडगाव शेरी परिसरात वातावरण तापलं असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम