पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१४ ऑक्टोबर) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. संध्याकाळी ५ वाजता मोदींचे मुंबई विमानतळावर आगमन होणार आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत.
आजपासून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाला सुरुवात होत आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये १४१ व्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करणार आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यांची प्रमुख बैठक पार पडणार आहे. ऑलिम्पिक खेळांच्या भविष्याबाबतचे महत्त्वाचे निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या आजच्या अधिवेशनात घेतले जाणार आहेत.
भारत दुसऱ्यांदा व सुमारे ४० वर्षांनंतर IOC सत्राचं आयोजन करणार आहे. (IOC) चे ८६ वे अधिवेशन हे यापूर्वी १९८३ मध्ये नवी दिल्ली येथे पार पडले होते. नुकतेच हँगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय क्रीडा क्षेत्रात आता आयओसीच्या सत्राबद्दल उत्सुकता वाढली आहे.
Manoj Jarange | उपमुख्यमंत्र्यांनी ही येडपटं पाळलीच कशी?
क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचाही अधिवेशनात समावेश
यंदाचं १४१ वे IOC चे अधिवेशन भारतात आयोजित केले जात आहे.आजच्या या सत्रात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक आणि IOC चे इतर सदस्य, भारतीय ऑलिम्पिक संघटनेसह इतरही विविध क्रीडा महासंघांचे प्रमुख भारतीय क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती आणि इतरही अनेक प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे आणि एथलीटस कमिशनचे सदस्य तसेच भारताचा आघाडीचा नेमबाज अभिनव बिंद्रा हादेखील उपस्थित असणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम