Prakash Ambedkar | आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडी होत असून, महाविकास आघाडीमधून वंचित बाहेर पडले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्ये हे महाविकास आघडीच्या विरोधातीलच होती. यानंतर काल प्रकाश आंबेडकर यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यात तब्बल दोन तास लोकसभा निवडणुकींबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. (Prakash Ambedkar)
दरम्यान, आता राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. कारण वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी थेट मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी तयार केली आहे. मनोज जरांगे यांच्यासोबतच्या भेटीनंतर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या नव्या आघाडीची घोषणा केली आहे. तर यामुळे ते महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतून बाहेर पडल्यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. (Prakash Ambedkar)
Prakash ambedkar : ‘२०२४ मध्ये फक्त मुस्लिमच मोदींना रोखू शकतात…’, आंबेडकर
Prakash Ambedkar | आम्ही दोघे मिळून लढणार
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे मध्यमांसमोर बोलताना म्हणाले की, “काल पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यात काही निर्णय झाले आहेत. तर काल रात्री माझी आणि मनोज जरांगे पाटील यांची भेट झाली. त्यांच्यासोबाबत सविस्तार बोलणे झाले. त्यात ओबीसीसोबत आघाडीचा निर्णय घेतला असून, मुस्लिम, जैन समाजालाही उमेदवारी देण्याचा निर्णय झाला आहे. जास्तीत जास्त उमेदवार हे गरीब वर्गातील असतील. तर, या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना मनोज जरांगे यांचं समर्थन असेल. ते त्यांची पुढील अंतिम भूमिका ही ३० तारखेला घेणार आहेत. मनोज जरांगेंनी ३० तारखेपर्यंत थांबण्याची विनंती केली आहे आणि त्यांची ही विनंती आम्ही मान्य केलीय. जरांगे आणि मी आम्ही दोघे मिळून लढणार आहोत.”(Prakash Ambedkar)
प्रकाश आंबेडकर या मतदार संघातून लढणार
दरम्यान, कालच्या राज्य कार्यकरिणीच्या बैठकीनंतर वंचितने उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. तर, यात स्वतः प्रसख आंबेडकर यांच्याही नावाचा समावेश असून, प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. त्यांनी स्वतः याबाबतची घोषणा केली आहे. गेल्या निवडणुकीतही प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती.
तर, तयावेळी त्यांनी एमआयएमचे नेते असुद्दीन ओवैसी यांच्यासोबत हातमिळवणी करत राज्यातील काही जागांवर उमेदवार जाहीर केले होते. तर, त्यावेळी ते स्वतः सोलापूर आणि अकोल्यातून लढले होते. एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी हे छत्रपती संभाजीनगरमध्ये यशस्वी ठरले. दरम्यान, या निवडणुकीत वंचितला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची साथ मिळणार असल्याचे दिसत आहे. (Prakash Ambedkar)
Maha Vikas Aghadi | महाविकास आघाडीत बिघाडी; ठाकरे अन् आंबेडकरांचे सूर जुळेना
अशी आहे वंचितच्या उमेदवारांची पहिली यादी
- अकोला : प्रकाश आंबेडकर
- भंडारा-गोंदिया : संजय केवट
- गडचिरोली : हितेश पांडूरंग मडावी
- चंद्रपूर : राजेश बेले
- बुलडाणा : वसंतराव मगर
- अकोला : प्रकाश आंबेडकर
- अमरावती : प्राजक्ता पिल्लेवान
- वर्धा : प्रा. राजेंद्र साळुंके
- यवतमाळ-वाशिम : खेमसिंग पवार(Prakash Ambedkar)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम