Poster war : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिली ही तंबी….

0
25

 

Chandrashekhar bawankule : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष भाजप आणि शिंदे गटांमध्ये बॅनरवॉर सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातून या पोस्टरवॉरला सुरुवात झाली असल्याची चर्चा सुरू असतांनाच भाजपने ठाणे, कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला आणि या वादाला आणखी वेगळं वळण मिळालं होतं. यातच दोन्ही पक्षाच्या काही अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून पोस्टर लावून या प्रकरणाला चिघळवण्याचा प्रयत्न केला जात असतानाच, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणीही पोस्टर लावू नका, प्रतिक्रिया देऊ नका, अशी तंबी भाजप कार्यकर्त्यांना दिली आहे.

Poster war : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिली ही तंबी….

शिंदे गट व भाजप सत्तेसाठी एकत्र नसून महाराष्ट्राचा विकास व्हावा, विकासाच्या रँक मध्ये महाराष्ट्र क्रमांक एक वर राहावा, तसेच हिंदुत्वाचा विचार वाढवा यासाठी एकत्र आले आहेत. यामुळे बॅनरबाजी, फोटो, जाहिरात याला काही अर्थ नसून अतिउत्साहात कार्यकर्त्यांकडून या गोष्टी केल्या जात आहेत. मात्र काहीही झालं तरी भाजप शिवसेना युती कायम राहणार त्यावर कोणीही बोलू नये, बॅनर लावू नये, तसेच आरोप करू नये अशा सूचना अध्यक्ष या नात्याने मी कार्यकर्त्यांना दिल्या असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंकडून सांगण्यात आलं.

जागा वाटपाबाबतही त्यांनी यावेळी भाष्य केलं असून युतीतील जागा वाटपाबाबत आमचा केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड अंतिम निर्णय घेईल. बाकीच्या फक्त तोंडाच्या वाफा आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसून ते सत्तेसाठी एकत्र लढत होते, असं म्हणत त्यांनी “निवडणुकीच्या तोंडावर दिल के तुकडे हुए हजार” अशी परिस्थिती महाविकास आघाडीची होणार असल्याचा दावा देखील केला आहे.

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघर मध्ये वेगळ्या वाहनातून का गेले यावर चर्चा सुरू असताना या चर्चेला काही अर्थ नसल्याच सांगत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला सोबतच दोन्ही नेते प्रगल्भ असून कोणतही कपट, कारस्थान त्यांच्या मनात नाही असं म्हणत त्यांनी फडणवीस आणि शिंदे यांचं कौतुकही केल आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here