भारत-ऑस्ट्रेलिया फायनलसाठी खुद्द पंतप्रधान उपस्थित राहण्याची शक्यता

0
28

भारत-ऑस्ट्रेलिया फायनल – अहमदाबाद | WorldCup 2023 चा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ अंतिम फेरीत आमनेसामने खेळणार आहेत. अंतिम सामन्यासाठी अहमदाबादमध्ये जय्यत तयारी सुरु आहे. खास ‘एअर शो’चे आयोजन करण्यात आलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेची ‘सूर्य किरण एरोबॅटिक टीम’ सामन्यापूर्वी आपला एअर शो सादर करणार आहेत. संरक्षण विभागाच्या गुजरातच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने ही माहिती शेअर केली असून ही टीम सुमारे 10 मिनिटे एअर शो करणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे.

नाशिक | शहरात हिऱ्यांच्या बाजारपेठेला वाढता प्रतिसाद; कोणत्या दागिन्यांना सर्वाधिक मागणी?

अंतिम सामना पाहण्यासाठी खुद्द पंतप्रधान ?
अंतिम सामन्यासंदर्भात आणखी एक माहिती समोर येत आहे की, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील येऊ शकतात. पंतप्रधान मोदींशिवाय 2011 चा विश्वचषक विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि 1983 चा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव देखील अंतिम सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर येऊ शकतात. याशिवाय भारतीय खेळाडूंचे कुटुंबीयही स्टेडियममध्ये उपस्थित राहू शकतात. हा सामना पाहण्यासाठी बीसीसीआय आणि आयसीसीचे बडे अधिकारीदेखील स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत.

Viral News | तरुणांचा प्रताप; स्कॉर्पिओचा सुसाट वेग अन् टपावर फटाक्यांची आतिषबाजी

अंतिम फेरीत भारत-ऑस्ट्रेलिया
भारत आणि ऑस्ट्रेलिया २० वर्षांनंतर वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भिडणार आहेत. याआधी हे दोन्ही संघ २००३ च्या एकदिवसीय विश्वचषकात आमनेसामने आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत विश्वचषक जिंकला होता. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडे त्या पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी आहे. टीम इंडियाने शेवटचा एकदिवसीय विश्वचषक २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. यावेळी पुन्हा टीम इंडिया जेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात आहे. विश्वचषक २०२३ मध्ये अद्याप अपराजित राहिलेल्या टीम इंडियाने चौथ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर टीम इंडियाने दोनदा हे विजेतेपद पटकावले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here