Politics News | राज्याचे राजकारण हे सध्या हिंदी मालिकांसारखे मनोरंजक आणि नाट्यमय घडामोडिंनी बहरलेले आहे. दरम्यान, सध्या यात एका पक्षाचे दोन गट हे एकमेकांवर सडकून आणि खालच्या पातळीवर टीका करताना दिसत आहे. ह्या सामन्यात शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार विरुद्ध अजित पवार गट तसेच कॉंग्रेस विरुद्ध भाजप ह्या पक्षांचा समावेश आहे. आता पुन्हा अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना आगामी निवडणुकांमध्ये पाडण्याचा विडा उचलला असून, आता खासदार कोल्हे यांच्या मदतीला सुप्रिया सुळे धावून आल्या आहेत. त्यांच्यावरील ह्या टिकेला सुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.(Politics News)
Namco Election | नामको बँकेसाठी देवळ्यात 56 .94 टक्के मतदान
दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी “एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी व वळसे पाटिल यांनी प्रयत्न केले, आणि त्यामुळे ते निवडून आले” अशी टीका शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर स्पष्ट नाव न घेता केली आहे. आता अजित पवार यांच्या ह्या टीकेनंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधलेला आहे, यावर त्या म्हणाल्या की, “ही लोकशाही आहे आणि इथे प्रत्येकाला आपापली मतं मांडण्याचा अधिकार आहे. ३८ व्या वर्षी शरद पवारांवर परिवारवाद केल्याचं लेबल नव्हतं, अशा खोचक शब्दांत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. (Politics News)
तसेच पुढे खासदार सुळे म्हणाल्या की, शरद पवार साहेबांनी वयाच्या ३८ व्या वर्षी जो निर्णय घेतला. त्याबद्दल शालिनीताई यांनी सविस्तरपणे सांगितलं होतं. पवार साहेब हे राज्याचे सर्वात कमी आणि युवा मुख्यमंत्री झाले. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यावर परिवारवादाचे लेबल लागलेलं नव्हतं. लोकसभेतही ते विरोधीपक्ष नेते झाले.” असे यावेळी सुळे म्हणाल्या.
Dhananjay Munde | मंत्री धनंजय मुंडे कोविड पॉजिटिव्ह..!
सुप्रिया सुळेंनी दिले ओपन चॅलेंज | (Politics News)
“पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह हे माझे ऐकतात”, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले त्यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मोदी आणि शहा हे त्यांचं ऐकतात असं दादा म्हणाले आणि जर तसं असेल तर स्वागतच आहे. आपले प्रश्न हे दादांच्या दरबारी आपण मांडूच. राज्यात सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी. तसेच शेतमालाला हमीभाव दिला जावा. मराठा, धनगर, आणि लिंगायत मराठा ह्या समाजांच्या आरक्षणाचा प्रश्न हा गंभीर असून, त्याचाही आढावा दादांनी तातडीने घ्यावा. आणि जर, तसंच झालं तर पवार साहेबांना जी संधी वयाच्या ३८ व्या वर्षी मिळाली तशी संधी दादांनाही मिळेल. (Politics News)
काय म्हणाले अजित दादा?
दरम्यान, अजित पवार म्हणाले होते की, “एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी खूप प्रयत्न केले, मात्र, आता त्यांच्याविरोधात दिलेला उमेदवार निवडून आणणारच” असे नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खासदार अमोल कोल्हे यांना घेरले आहे. (Politics News)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम