Political News | विधानसभेला शिंदेंच्या विरोधात लढलेला उमेदवार करणार शिंदेसेनेत प्रवेश!

0
50
#image_title

Political News | विधानसभा 2024 ची निवडणूक बहुमताने जिंकून महायुतीने आपली सत्ता कायम ठेवली आहे. त्यानंतर आता राज्यात सर्वांना मुख्यमंत्री कोण होणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढविलेला उमेदवार निकालानंतर आता शिंदेसेनेत प्रवेश करणार आहे. रविवारी रात्री उशिरा त्यांनी ही घोषणा केल्याची माहिती आहे.

Political News | निकालापूर्वी ठाकरेंचा भाजपला दणका!; महत्त्वाच्या नेत्याने हाती घेतली मशाल

लता शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश करण्याची केले घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्नी लता शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मनोज शिंदे यांनी हा निर्णय जाहीर केला असून मनोज शिंदे हे काँग्रेसमधून बंडखोरी करीत कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून उभे राहिले होते. त्यामुळे शिंदे यांची काँग्रेसने 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली होती. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष होते. परंतु उद्धव सेनेचा उमेदवार जाहीर होताच, एकतर्फी निवडणूक होणार असल्याची चर्चा होती. तर काँग्रेसमधून बंडखोरी करीत मनोज शिंदे यांनी देखील या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

Political News | ‘आम्हाला दोन्ही बाजूंनी फोन आलेत पण…’; निकालाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंचा मोठा खुलासा

शपथविधीनंतर करणार शिंदेसेनेत प्रवेश

उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार असताना काँग्रेसच्या मनोज शिंदे यांनी निवडणुकीत उडी मारल्याने शिंदे यांची हकालपट्टी करण्यात आली होती. दरम्यान, निवडणुकीचा निकाल लागताच मनोज शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशाची घोषणा केली असून लवकरच ते महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती  आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here