Political News | मुख्यमंत्रीपदावरून ‘मविआ’तील वाद चव्हाट्यावर; राऊत-पटोले यांच्यातील खडाजंगी सुरूच

0
9
#image_title

Political News | विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली असून यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे याचा फायदा कोणाला होणार आहे. हे आता निवडणुकीत स्पष्ट होईल. त्यापूर्वी बऱ्याच एक्झिट पोल्समध्ये महायुतीचे सरकार पुन्हा येईल असा दावा करण्यात आला असून महाविकास आघाडी 170 ते 175 जागा जिंकेल असा अंदाज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटले यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर ‘काँग्रेसच्या नेतृत्वात महा विकास आघाडीचे सरकार बनेल’ असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत टोला लगावला आहे.

Political News | वर्ध्यात शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळेंना मारहाण

काय म्हणाले संजय राऊत? 

यावर बोलताना “काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल मी हे मानत नाही. परंतु महाविकास आघाडीचे सरकार असेल. याविषयी आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ. जर नाना पटोले ते म्हणत असतील किंवा पटोलेंना जर हाय कमांडने, “तुम्ही मुख्यमंत्री बनणार आहात. हे सांगितलं असेल, तर राहुल गांधी, प्रियंका गांधी व मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर करायला हवे होते.” असं म्हणत टोला लगावला आहे.

मुख्यमंत्रीपदावरून मविआत रस्सीखेच

तर राऊत आणि पोटोले यांच्यातील हा पहिलहरियाणातसून हरियाणा काँग्रेसच्या पराभवानंतर खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर तिखट प्रतिक्रिया दिली होती. त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवारही केला होता. महाविकास आघाडीतील जागावाटप मुख्यमंत्री पद यासारख्या विविध मुद्द्यांवरून अनेकदा राऊत आणि पटोले आमने-सामने आले असून त्यात आता विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर ही मुख्यमंत्री पदावरून ठाकरे गट व काँग्रेस यांच्यामधील वाद समोर आला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यावर्षी 65 टक्के हुन अधिक मतदान झाले असून सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी आमचे सरकार कायम राहील असा विश्वास व्यक्त केला आहे. तर दुसरीकडून विरोधकांनी लोकसभेप्रमाणे विधानसभेतही महायुती सरकारचे स्वप्न भंगणार. असा दावा केला आहे.

Political News | परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला बेदम मारहाण; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!

दरम्यान, राज्यात युती व आघाडी यांच्यात थेट लढत असून भाजप 149 शिवसेना 81 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 59 जागांवर निवडणूक लढवत आहेत. तसेच काँग्रेस 101 ठाकरे गट 95 व शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 86 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर या निवडणुकीत युती आणि आघाडीत काही मतदारसंघात उमेदवार एकमेकांसमोर उत्तरले असून काही ठिकाणी बंडखोरी झाल्याचे दिसून आले आहे. शिवाय मनसे, वंचित आणि अपक्षांमुळे निकालात काय फरक पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणा र आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here