Political News | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगाव येथे झालेल्या सभेत 70 कोटींच्या सिंचन घोटाळ्याबाबत केलेल्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. “सिंचन प्रकरणात खुल्या चौकशीसाठी फाईलवर तात्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटलांनी सही केली होती.” असं वक्तव्य अजित पवार यांनी जाहीर सभेत केले. तसेच आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला केला होता. या विधानावर राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवारांच्या वक्तव्यावर स्मिता पाटील यांची प्रतिक्रिया
तासगाव येथील कवठेमहांकाळ येथे संजय काका पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, “माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी माझ्यावर 70,000 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर, आर. आर. पाटील यांनी खोली चौकशी करण्याच्या फायद्यावर स्वाक्षरी केली.” असा दावा केला होता. अजित पवारांनी केलेल्या आरोपांनंतर आता आर. आर. पाटील यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिली असून आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“आबा गेल्यानंतर आमच्या कुटुंबावर व तासगाव कवठेमहांकाळ मधील जनतेवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आमच्या आईने कधीही राजकारणात सक्रिय सहभाग घेतला नव्हता पण आबा गेल्यानंतर रोहित आणि मी लहान असल्याने आईवर ती जबाबदारी गेली दहा वर्ष अतिशय उत्तम पद्धतीने सांभाळली. हा कारभार सांभाळताना रोहित ने वेळोवेळी तिला मदत केली. एक बहिण व शरद पवार गटाची कार्यकर्ते म्हणून रोहित भरघोस मतांनी तो विजयी होईल असा मला विश्वास आहे.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Political News | शेखर पगारांना शिवीगाळ केल्याप्रकरणी, सुहास कांदेवर गुन्हा दाखल
आम्ही अजित पवारांकडे वडील या नात्याने पाहतो…
“कुटुंबीयांना हे ऐकून फार वाईट वाटले, फक्त कुटुंबीयांनाच नाही तर तासगाव कवठेमहाकांळ मधील जनता तसेच महाराष्ट्रातील आबा प्रेमींना देखील त्याबद्दल फार वाईट वाटले आहे. आबांना जाऊन साडेनऊ वर्षे झाली आणि आता अजित पवारांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. आम्ही अजित पवारांकडे वडील या नात्याने पाहतो…आबा आपल्या स्वच्छ प्रतिमेसाठी ओळखले जातात. त्यामुळे आबांवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही.” असे देखील त्यावेळी म्हणाल्या.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम