Political News | आज मालेगावात पालकमंत्री दादा भुसे यांनी उमेदवारी अर्ज भरला असून यावेळी भव्यशक्ती प्रदर्शन करीत रॅली काढण्यात आली. त्यानंतर विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्यासह रामदास कदम देखील उपस्थित होते. या सभेत त्यांनी दादा भुसे यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
Dada Bhuse | मालेगावच्या सभेत दादा भुसे कडाडले; ‘येडं पायडू’ म्हणत हिरेंना ललकारले
रामदास कदमांनी दिल्या दादा भूसेंना शुभेच्छा
यावेळी बोलताना “कोकणातून मी खास दादा भुसे यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो असून दादा भुसे किमान उपमुख्यमंत्री व्हावे याच शुभेच्छा आहेत. जनसेवा कशी करतात ते दादा भुसे यांच्याकडे पहावे. दिव्यासारखे जाळून स्वतःच्या मतदारसंघात त्यांनी प्रकाश टाकला आहे. समाजाच्या सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेते म्हणजे दादा भुसे असे म्हणत दादा भुसे यांचे कौतुक केले.”
उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा
त्याचबरोबर, “आमचे मुख्यमंत्री दिल्लीत जातात पण लाडक्या बहिणीसाठी शेतकऱ्यांसाठी निधी आणतात तुम्ही लाचार झालात. तुम्ही दिल्लीत सोनिया गांधींना हुजुरी घालण्यासाठी जाता.” असे म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच आदित्य ठाकरे यांना पेंग्विन म्हणत “यांचे पिल्लू ते पेंग्विन, याच पिल्लू ने माझ्या पाठीत खंजीर खोसला. चाळीस लोक का जातात त्याचे आत्मपरीक्षण करा.” असे म्हणत ठाकरे गटाला टोला लगावला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम