Shivsena UBT | शिवसेना उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर; या 15 उमेदवारांना मिळाली संधी

0
51
#image_title

Shivsena UBT | महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची पक्षाची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये 15 उमेदवारांच्या नावांचे घोषणा करण्यात आली असून या यादीत मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांना वडाळ्यातून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर भायखळ्यात मनोज जामसुतकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपमधून राष्ट्रवादी व त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणारे माजी आमदार अनिल गोटे यांना धुळे शहरातून उमेदवारी देण्यात आली आहे. या आधी शिवसेने कडून 65 उमेदवारांची यादी घोषित करण्यात आली होती. तर आता दुसरी यादी समोर आली आहे.

शिर्डी मध्ये मनसे विरुद्ध शिवसेना लढत पाहायला मिळणार

या यादीत मुंबईतील तीन, ठाण्यामधील दोन जागांवर उमेदवार दिला असून काँग्रेस सोबत वाटाघाटी वेळी खटके उडाल्याचे पाहायला मिळाले होते. नितेश राणें विरोधात संदेश पारकर, यामिनी जाधवांविरोधात मनोज जामसुतकर तर वडाळ्यामध्ये पोट निवडणुकीत पराभूत झालेल्या श्रद्धा जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिर्डीमध्ये मनसेच नेते बाळा नांदगावकर विरुद्ध अजय चौधरी अशी लढत पाहायला मिळणार आहे. तर बुलढाण्यातून जयश्री शेळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसमधून जयश्री शेळके यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. बबनराव घोलप यांचे सुपुत्र योगेश घोलप यांना देवळाली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.

रत्नागिरीत शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत

रत्नागिरीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पहायला मिळणार असून उदय सामंत विरुद्ध ठाकरे गटाचे बाळा माने अशी लढत होणार आहे. दरम्यान काँग्रेसमध्ये मुंबईतील जागा कमी झाल्याने नाराजीचा सूर पाहायला मिळत होता. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाकरे गटाची दुसरी यादी पुढीलप्रमाणे

अनिल गोटे – धुळे शहर

राजू तडवी – चोपडा (अज)

जयश्री सुनील महाजन – जळगाव शहर

जयश्री शेळके – बुलढाणा

श्यामलाल जयस्वाल – दिग्रस पवन

रूपाली राजेश पाटील – हिंगोली

आसाराम बोराडे – परतुर

योगेश घोलप – देवळाली (अजा)

सचिन बासरे – कल्याण पश्चिम

धनंजय बोडारे – कल्याण पूर्व

श्रद्धा श्रीधर जाधव – वडाळा

अजय चौधरी – शिवडी

मनोज जामसुतकर – भायखळा

अनुराधा राजेंद्र नागवडे – श्रीगोंदा

संदेश भास्कर पारकर – कणकवली


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here