Deola | देवळ्यात मोठी राजकीय उलथापालथ!; केदा आहेर तुतारी फुंकणार…?

0
193
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देवळा तालुक्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली असून नाशकात देवळा-चांदवड मतदार संघात डॉ. राहुल आहेर यांना भाजपकडून तर गणेश निंबाळकर यांना प्रहारकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच काँग्रेसकडून माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. देवळा-चांदवड मतदार संघातील भाजप नेते केदा आहेर यांनी देखील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, केदा आहेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असून काँग्रेसच्या जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. सटाणा शरद पवार गटाची जागा काँग्रेसला व चांदवड शरद पवार गटाला जाण्याची शक्यता आहे.

Deola | केदा आहेर यांच्या समर्थनार्थ देवळा बाजार समितीच्या उप सभापतींसह सर्व संचालकांनी दिले राजीनामे

स्व. शांताराम तात्या आहेर यांच्या गटाच्या वतीने उद्या सवांद मेळाव्याचे आयोजन

देवळा येथे माजी आमदार स्व. शांताराम तात्या आहेर यांच्या गटाच्या वतीने होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरविण्यासाठी उद्या रविवारी दि. २७ रोजी दुपारी ठीक २ वाजता बाजार समितीचे सभापती योगेश आहेर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता सवांद मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. तालुक्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली असून, भाजप कडून विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर हे सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर यांनी मतदारसंघात आपला प्रचार दौरा सुरू केला आहे. त्यांनी चांदवड, देवळा येथे मेळाव्यांच्या माध्यमातून रणसिंख फुंकले असून ते मंगळवारी दि. २९ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. . तर महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवारीची अधिकृत घोषणा न झाल्याने मतदारसंघात संभ्रम निर्माण झाला आहे.

Deola | चांदवड विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून दिगंबर जाधव यांना उमेदवारी

मेळाव्यात कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतले जाणार

दरम्यान, या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती ठरविण्यासाठी देवळा येथील माजी आमदार स्व. शांताराम तात्या आहेर गटाकडून उद्या रविवारी देवळा येथे कार्यकर्ता सवांद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, यात कार्यकर्त्यांचे मत जाणून घेऊन कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, याबाबत या मेळाव्यात निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अशी माहिती बाजार समितीचे सभापती योगेश आबा आहेर, माजी संचालक जगदीश पवार आदींनी दिली. या मेळाव्यात काय घडामोडी घडतात याकडे अन्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह तालुका वासींयांचे लक्ष लागून राहिले आहे. यामुळे तालुक्यात राजकिय घडामोडींनी वेग घेतला असून, राजकिय चर्चांना उधाण आले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here