Political News | राज्यात विधानसभा निवडणुकीची धुमाळी उठली आहे. त्यात ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. अशातच आता राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला असून महायुती पुन्हा एकदा बिनशर्थ पाठिंब्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर आता विधानसभेच्या रणधुमाळीत महायुती मनसेला काही जागांवर पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Political News | शरद पवारांची मोठी खेळी; विनायक मेटेंचा शिवसंग्राम पक्ष राष्ट्रवादीत विलीन
शिंदे फडणवीस आणि ठाकरे यांची गुप्त बैठक
मुंबईतील एका हॉटेलमध्ये शनिवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती असून शनिवारी रात्री झालेल्या या चर्चेत राज्यातील काही मतदारसंघांबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. 2 तास झालेल्या या चर्चेत मुंबईतील वरळी, माहीम, शिवडी या मतदारसंघांसह इतर काही जागांंबाबतही चर्चा झाली आहे. त्यामुळे महायुती आणि मनसेपुढे काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Political News | नाशिक पश्चिममध्ये भाजपात खडाजंगी; सीमा हिरेंच्या उमेदवारीला इच्छुकांचा विरोध..?
लोकसभेच्या बिनशर्तीची परतफेड होणार?
शनिवारी रात्री 12 वाजता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे नागपुरातून मुंबई आले होते. रात्री 12 वाजता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा हा वरळीपर्यंत आला त्यानंतर हा ताफा अज्ञातस्थळी गेला अशी माहिती आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील ठाण्याहून मुंबईच्या दिशेने निघाले होते. मध्यरात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली असून या 3 नेत्यांमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाल्याची माहित आहे. हे राज ठाकरेंसोबत झालेल्या गुप्त बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस पहाटे 3 वाजता सागर बंगल्यावर गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील 3 वाजता वर्षा बंगल्यावर पोहोचले. शनिवारी मध्यरात्री शिंदे-फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये जवळपास 2 तास चर्चा झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या बिनशर्तीची परतफेड केली जाणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम