Political News | नाशिक पश्चिममध्ये भाजपात खडाजंगी; सीमा हिरेंच्या उमेदवारीला इच्छुकांचा विरोध..?

0
56
#image_title

Political News | राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. अशातच आता महायुती सरकारची उमेदवारी जाहीर करण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आली असून पक्षातील इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यात नाशिकच्या पश्चिम मतदारसंघातील भाजपाच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. गेली दहा वर्ष सीमा हिरे या आमदार राहिला असून त्यांनी पश्चिम मतदारसंघात कोणतीही कामे केलेली नाहीत. हा मुद्दा धरत सीमा हिरे यांच्या उमेदवारीला भाजपाच्या इतर इच्छुक उमेदवारांकडून एकमुखी विरोध दर्शवला जात आहे. इतकी वर्षे आमदार म्हणून संधी मिळूनही त्यांच्याकडून हवा तसा बदल घडला नसून लोकसभेच्या निकालाच्या अनुषंगाने विचार करता, भाजपला नाशिक पश्चिम मतदारसंघातील जागा गमवायची नसेल तर हिरेंना उमेदवारी देऊ नये. अशी भूमिका भाजपाच्या मंडळींनी घेतली आहे.

Political News | पराभवाच्या भीतीने भाजपचा रडीचा डाव; मतदार यादीत घोळ केल्याचा नाना पटोलेंचा गंभीर आरोप

पक्षाला नव्या चेहऱ्याची गरज

सातपूरच्या एका हॉटेलवर बैठक घेत नाशिक पश्चिम मतदार संघातील इच्छुकांनी सीमा हिरे यांच्या उमेदवारीला विरोध करत, या विधानसभा निवडणुकीत पक्षाला नव्या चेहऱ्याची गरज आहे. अशी कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची अपेक्षा असल्याची भूमिका शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यापुढे मांडली. ही बाब आता भाजपच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचली असून यावर आता वरिष्ठ नेते कोणती भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या या बैठकीला भाजपातील सर्व मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी गेल्या अनेक वर्षांपासून विधानसभेची तयारी करणारे दिनकर पाटील, धनंजय वेळे, जगन पाटील, लक्ष्मण सावजी, शशिकांत जाधव इत्यादी इच्छुक मंडळी उपस्थित होती. या मंडळींनी भाजपचे शहर कार्यालय गाठत शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांची भेट घेत आपली भूमिका मांडली.

Political News | समाजवादी पार्टीचे पक्षप्रमुख खा. अखिलेश यादव उद्या मालेगावच्या दौऱ्यावर

इतरांनाही संधी मिळावी

सीमा हिरे नाशिक पश्चिम मतदारसंघात मागील दोन टर्म पासून आमदार म्हणून कार्यरत असूनही त्या फारसा प्रभाव पाडू शकलेल्या नाहीत, त्यात या मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची वाढती संख्या लक्षात घेत इतरांना ही संधी मिळावी. अशी भूमिका यावेळी भाजपच्या मंडळींकडून मांडण्यात आली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत नाशिकचा पश्चिम मतदार संघ कोणाच्या वाटायला येणार? हे पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here