Manoj Jarange | अंतरवाली सराटिमध्ये सोमवारी मध्यरात्री मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली. सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगेंच मुक्तिसंग्राम दिनी सहावं उपोषण सुरू आहे. यावेळी “मी जीव घेणा प्रवास सुरू केला असून, तुम्ही आरक्षण दिलं नाही तर तुमचे 12-13 वाजवल्याशिवाय सोडणार नाही. माझ्या नावाने नंतर बोंबलायचं नाही. मराठ्यांची पोरं सोपी नाहीत. 2024 ला तुमचा भुगा करणार असा इशारा माध्यमांशी बोलताना जरांगेंनी दिला.
काय म्हणाले जागे पाटील
“महायुती असो किंवा महाविकास आघाडी आमच्या मागण्यांच्या अंमलबजावण्या करा अन्यथा खड्ड्यात जा, पडा, निवडून या नाहीतर वाकडे तिकडे व्हा. आम्हाला काही देणे घेणे नाही. मी सरकारशी बोलण्यासाठी यावे म्हणून आंदोलन करत नाही. आपल्या ताकदीवर आणि समाजावर विश्वास आहे. मला कोणतेही राजकीय स्टेटमेंट करायचे नाही. फडणवीस साहेब म्हणतात की राजकीय भाषा बोलतात. मग काम न करणाऱ्याला लोक कसा फायदा होऊन देतील? तुम्ही फायदा केलात तर उघड्या डोळ्यांनी समाज बघतो कोणी फायदा केला. तेव्हा आम्हाला राजकीय स्टेटमेंट करायचे नाही. आम्ही फडणवीस यांना संधी दिली आहे.” असे ते यावेळी म्हणाले.
आमच्या मागण्या आता सगळ्यांच्या पाठ झाल्या आहेत. माझा समाज मला सांगतोय की उपोषण करायचे नाही. तुम्ही फक्त सांगा कोणाला पाडायचयं आणि कोणाला उभा करायचं. आम्हाला राजकारण करायचे नाही. आम्हाला त्याची काही गरजही नाही.” अस म्हणत त्यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला.
Manoj Jarange Patil | प्युअर दलिंदर, साडेसाती, येडं; जरांगेंनी भुजबळांची पार आब्रूच काढली..!
राजेंद्र राऊतांवर केली टीका
” देवेंद्र फडणवीस यांना संधी आहे. माकडचाळे करण्यापेक्षा चोरटे पुढे घालण्यापेक्षा त्यांनी तिकडे ताकद लावावी. आता त्यांनी फडणवीस साहेबांना सांगायचे की तो गप बसलाय. राजकीय भाषा बोलत नाही. त्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. फडणवीस साहेबांनाच ही संधी आहे. माझ्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळवून द्या. मला समोरून कितीही बोलले तरी, मी राजकीय भाषा बोलणार नाही.” असे म्हणत राजेंद्र राऊतांवर टीका केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम