Sharad Pawar | येवला मतदारसंघांमध्ये मनोज जरांगे पाटील प्रभावीपणे काम करत असल्यामुळे निफाड तालुक्यातील संबंधित 48 गावांमध्ये मंत्री भुजबळ यांच्या विरोधात वातावरण तापलेलं आहे. तेथील कार्यकर्ते देखील अतिशय आक्रमक आहेत. यातच आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात उमेदवारीसाठी चाचणी सुरू असून, यासंदर्भात सोमवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विविध इच्छुक उमेदवारांसोबत दोन तास चर्चा केली.
Sharad Pawar | शेतकरी मेळाव्यात शरद पवारांचा महायुती सरकारवर हल्लाबोल
तेव्हा या भागातून अनेकांनी आता निवडणुकीची तयारी सुरू केली असून इच्छुकांची संख्या ही जास्त आहे. महाविकास आघाडीच्या या शिक्षकांशी काल जेष्ठ नेते शरद पवारांनी एकत्रितपणे व व्यक्तिशः चर्चा केली. या चर्चेमध्ये निवडणुकीची एकूणच रणनीती आणि उमेदवार कोण असेल याबाबत कोणताही संकेत दिला नसून सोमवारी मुंबईत झालेल्या या बैठकीत भुजबळ यांच्या विषयी राजकीय आणि निवडणूकीत मतदार संघाच्या विभागणीची माहिती शरद पवारांनी विचारली. यावेळी इच्छुकांचा गोंधळ उडाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
बैठकीत इच्छुक उमेदवारांशी चर्चा
येवला मतदार संघाच्या रणनीतीसंदर्भात शरद पवारांनी इच्छुक उमेदवारांसोबत दोन तास चर्चा केली. यामध्ये काही वेळ प्रत्येक इच्छुकाचे मत जाणून घेण्यासाठी वन-टू-वन चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर पवारांनी इच्छुकइच्छुकांना एकत्र रहा आणि आपले ध्येय काय आहे हे लक्षात ठेवा व त्यासाठी व्यक्तिगत इच्छांना मुरड घाला असे अप्रत्यक्षपणे सुचित केल्याची माहिती आहे. या बैठकीमध्ये येवल्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार मारोतराव पवार, जयदत्त होळकर, माणिकराव शिंदे, संजय बबनकर, शिवसेना ठाकरे गटाचे शिवा सुरासे, सोनिया होळकर, कुणाल दराडे, डॉ. सुजित गुंजाळ इत्यादी इच्छुक उपस्थित होते.
BJP vs Sharad Pawar | ‘भाजपाचा बडा नेता शरद पवारांच्या गळाला!’; विधानसभे आधीच भाजपला मोठं खिंडार
येवला मतदार संघामध्ये आगामी निवडणुकीत छगन भुजबळांविरोधात कोण उभा राहणार हा सगळ्यात मोठा उत्सुकतेचा विषय जरी असला, तरी त्याविषयी या बैठकीत कोणताही निर्णय झाला नसल्याचे समोर आले आहे. तसेच संबंधित इच्छुकांशी झालेल्या चर्चेत शरद पवार समाधानी होते की नाही हे देखील स्पष्ट झालेले नाही. तेव्हा आता येवला मतदार संघाची रणनीती पवार येत्या दोन आठवड्यात घेण्याची शक्यता वर्तवली जात असून यामध्ये अतिशय विचारपूर्वक उमेदवार दिला जाण्याची शक्यता या चर्चेतून पुढे येत आहे.
काही नेते भुजबळांच्या उपकाराखाली
येवला मतदार संघातील काही नेते भुजबळांच्या उपकाराखाली असून किती इच्छुक उघडपणे विरोधी संघर्ष करू शकतील याची चाचपणी पवारांनी केली. यावेळी अंबादास बनकर, संभाजी बनकर यांसह काही नेते या बैठकीला गेले नव्हते. या नेत्यांची भूमिका काय असेल यावरून देखील संभ्रम आहे. तर भुजबळ यावेळी पाचव्यांदा उमेदवारी लढवत असून यंदाची निवडणूक आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकांएवढी सोपी नसणार आहे. यावेळी त्यांच्याबरोबर असणारे पवार समर्थक नेते किती उघडपणे त्यांचा प्रचार करू शकतील हा देखील प्रश्न आहे. सामाजिक दबावामुळे यातील अनेक लोक भुजबळ यांच्याबरोबर किती मनापासून असतील हा ही गंभीर विषय आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम