Political News | शिंदे गटाच्या आमदाराची अजब घोषणा; राहुल गांधींची जीभ कापणाऱ्याला देणार 11 लाखांचे बक्षीस

0
28
#image_title

Political News | विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे राजकारणात वादाची ठिणगी पेटली आहे. याच पार्श्वभूमीवर “राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला अकरा लाखांचं बक्षीस देऊ” अशी अजब घोषणा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केली. ज्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे आणि आता याचे प्रतिसाद संपूर्ण भारतभर उमटण्याची शक्यता आहे.

Political News | ‘त्या’ आमदारांची काँगेसकडून हकालपट्टी; काँगेसमधून बाहेर पडताच ‘भाजपवासी’ होणार..?

आज संजय गायकवाड यांनी बुलढाणा येथे प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी सोबत बोलताना “राहुल गांधींच्या आरक्षण विरोधी विधानामुळे काँग्रेसच्या खरा चेहरा समोर आला आहे. राहुल गांधींनी विदेशात जाऊन हे विधान करून आपली आरक्षण विरोधी भूमिका मांडली असून, त्यांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय यांचे आरक्षण संपवायचे आहे.” असे वक्तव्य केले.

ओबीसी दलित आदिवासी यांना इतरांसमवेत तसेच पुढारलेले जातींसोबत येण्याची आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती साधण्याची संधी मिळावी यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून त्यांना आरक्षण दिले होते. परंतु, राहुल गांधींनी मात्र विदेशी भूमीवर आरक्षण विरोधी भूमिका मांडली आहे. या राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला माझ्याकडून 11 लाख रुपयांचे बक्षीस येईल.” असे स्फोटक विधान आमदार संजय गायकवाड यांनी चर्चेदरम्यान केले. “लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात याच नेत्यांनी आणि त्यांच्या पक्षाने भारतीय जनता पार्टी केंद्रात पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलेल, आरक्षणाला धोका आहे. असा नरेटीव्ह तयार केला होता. आता राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी भूमिका मांडली असून त्यांचा आदिवासींबद्दलचा कळबळा वर वरचा असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Political News | शिंदे फडणवीसांसमोर ठाकरे देणार तगडे आव्हान; कोणता डाव टाकणार..?

मुख्यमंत्र्यांच्या बुलढाणा दौऱ्यावर पडसाद उमटणार? 

19 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बुलढाणा जिल्ह्यात येणार आहेत. बुलढाणा शहरात तिन्ही नेते अर्धा दिवस असणार आहेत. तेव्हा आमदार संजय गायकवाड यांच्या या विधानामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्यावर पडसाद उमटण्याची शक्यता आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here