Political News | शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची वैजापूरमध्ये काही दिवसांपूर्वी सभा झाली होती. ज्यामध्ये उद्धव ठाकरेंनी रमेश बोरनारे यांच्यावरती टीका केली होती. रमेश बोरनारे शिवसेनेतील फुटी नंतर शिंदे गटासोबत गेले. उद्धव ठाकरे यांनी केलेले याच टीकेला आता आमदार बोरनारेंनी उद्धव ठाकरेंवर “पैसे घेऊन उमेदवारी देणार होते” असा गंभीर आरोप केला आहे.
“बाळासाहेब आज असते तर त्यांनीच तुम्हाला उलटे टांगले असते”
उद्धव ठाकरे यांनी वैजापूर येथील सभेत “40 आमदारांनी पक्षाशी गद्दारी करून, महाराष्ट्राच्या मातीला गद्दारीचा कलंक लावला आहे. वैजापूरच्या आमदाराने या भूमीला ही कलंक लावला. येणाऱ्या निवडणुकीत बोरनारेंना पराभूत करून उलटे टांगा.” असं म्हणत टीका केली होती. याच टिकेला प्रतिउत्तर देत आमदार रमेश बोरनारेंनी “ते काल माझ्यावर वैजापूर येथे येऊन टीका करून गेले. आज जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते आणि त्यांनी तुम्हाला काँग्रेस बरोबर आघाडी करताना पाहिले असते तर तुम्हालाच उलटे चांगले असते.” असं म्हणत पलटवार केला आहे.
“शिवसैनिक आत्महत्या करतील”- रमेश बोरनारे
त्याचबरोबर “गेल्या निवडणुकीत मला सहज उमेदवारी मिळाली नाही. शेवटच्या क्षणी ते पैसे देणाऱ्याला तिकीट देणार होते. पण मी त्यांना भेटून, गेल्या पंचवीस वर्षापासून मी शिवसेनेसाठी खूप किती काम केले हे सांगितले, मी त्यांना एवढे देखील म्हणालो की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिकीट दिले नाही तर शिवसैनिक आत्महत्या करतील. माजी मुख्यमंत्र्यांचा तोल घसरला असून ते एका आमदारावर टीका करू लागले आहेत. हे त्यांना शोभत नाही. वैजापूरला आल्यावर ठाकरे एखाद्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करतील असे आम्हाला वाटले होते. पण ते आले आणि टीका करून गेले.” असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम