Mahayuti Sarkar | राज्यामध्ये सध्या महायुती सरकार आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपबरोबर इतर लहान पक्ष सामिल आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत समाविष्ट झाल्यानंतर शिवसेना आमदार आणि पदाधिकारी नाराज झाल्याचे चित्र होतं. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निधी दिला मिळत नसल्याची तक्रार करण्यात येत होती. त्यातच आता परभणी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पक्षातील पदाधिकाऱ्याने निधी मिळत नसल्याकारणामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे. ज्ञानोबा व्हावळे या माजी जिल्हा परिषद सदस्याने विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला. परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे. तेव्हा राष्ट्रवादीचे पालकमंत्री असलेल्या नियोजन समिती मधून निधी मिळत नसल्याने ज्ञानोबा व्हावळे यांनी विष पिण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे.
Mahayuti Sarkar | मुख्यमंत्रीपदासाठी महायुतीत रस्सीखेच?; गिरीश महाजनांच्या विधानाने वेधलं लक्ष
नेमकं काय घडलं?
परभणी जिल्हा नियोजन समिती मधून निधी मिळत नसल्याने विरोधकच नाही तर सत्ताधारी गटातही नाराजीचे सूर होते. शिंदे गटाच्या शिवसेनेचे सदस्य देखील निधी मिळत नसल्याची तक्रार करत आहेत. त्यातच आता शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. संजय बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि परभणीचे पालकमंत्री असून त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा झाली होती. नियोजन समितीतून निधी मिळत नसल्याने ज्ञानोबा व्हावळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ तळला. परंतु घडल्या प्रकारामुळे महायुतीत सारं काही अलबेल नसल्याचे आणखीन एक उदाहरण समोर आले.
Mahayuti Sarkar | शिंदेंच्या नेत्यांमुळे युतीत वादाची ठिणगी; शिंदे करणार आज नेत्यांची कानउघडणी..?
अपमानास्पद वागणूकीमुळे घेतला निर्णय
“जिल्हाधिकारी सांगतात मंत्र्यांकडे जा…मला सदस्य म्हणून जरी घेतले असले तरी कोणत्याही प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नाही. माझा सातत्याने अपमान करण्यात आला आहे. मी रस्त्याची कामे मागितली. पालकमंत्र्यांना त्यासाठी 9 वेळा भेटलो, तरी मला निधी मिळाला नाही.” असे ज्ञानोबा वावडे यांनी सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम