Central Government | केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्ताव मंजूर

0
41
modi-shah
modi-shah

Central Government | केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये ‘एक देश एक निवडणूक’ हा प्रस्ताव बुधवार दि. 18 रोजी मंजूर करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी याबाबत विधान केले होते. तेव्हा हा कायदा कधीपासून लागू होईल याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

भाजपची दुसऱ्यांदा सत्ता आल्यानंतर 2019 मध्ये ‘एक देश, एक निवडणूक’ यावर चर्चा करण्यासाठी देशातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना भाजपने बोलावले होते. यावेळी तृणमूल, काँग्रेस बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी आणि द्रविड मुन्नेत्र कझगम या पक्षांनी जाण टाळायला होतं. तर आम आदमी पार्टी, तेलुगु देसम पक्ष, भारत राष्ट्र समिती या पक्षांनी या बैठकीला हजेरी लावली होती.

Political News | ‘रश्मी ठाकरेंनी राजकारण…’; महिला मुख्यमंत्री पदासाठी रश्मी ठाकरेंबद्दल किशोरी पेडणेकरांचे मोठे वक्तव्य

काय आहे ‘एक देश, एक निवडणूक’ कायदा? 

देशामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेणे असा ‘एक देश, एक निवडणूक’ याचा अर्थ होतो. यामध्ये नागरिकांना दोन्ही निवडणुकांसाठी एकाच वेळी मतदान करता येते. सध्या देशांमध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या घेतल्या जातात. दर पाच वर्षांनी या निवडणुका येतात.

Political News | ‘जरांगेंचे लाड हे जातीयवादी…’; ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

‘एक देश, एक निवडणुक’ साठी तीन समित्या स्थापन करण्यात आल्या असून रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली चौथी समिती स्थापन करण्यात आली. ही समीती पंधरा दिवसात आपला रिपोर्ट सादर करेल का याबाबत प्रश्न आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here