Sanjay Gaikwad | विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी संजय गायकवाड यांच्या विरोधात दिल्लीमध्ये तक्रार दाखल झाली असून दिल्लीच्या तुघलक रोड पोलीस ठाण्यात काँग्रेसने आमदार संजय गायकवाड यांच्यासह केंद्रीय मंत्री रवनीत बीट्टू यांच्या विरोधात देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेस नेते अजय माकन यांच्याकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधींनी परदेशात असताना आरक्षण संदर्भात केलेल्या वविधानावरून आमदार संजय गायकवाडांनी त्यांच्यावर टीका करत “राहुल गांधींची छाटणाऱ्या लाकडा लाखांचे बक्षीस देणार.” असे खळबळ जनक वक्तव्य केले होते. गायकवाडांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्या विरोधात सडकून टीका केली. त्यानंतर आता काँग्रेसने दिल्लीमध्ये आमदार गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून काँग्रेसचे उपाध्यक्ष अजय मानक यांनी एनडीएच्या चार नेत्याविरुद्ध दिल्लीच्या तुघलक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
काय म्हणाले होते संजय गायकवाड?
पत्रकार परिषदेत बोलत असताना आमदार संजय गायकवाडांनी राहुल गांधींवर टीका करत “काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला असून, राहुल गांधी यांच हे वक्तव्य हा जनतेचा सर्वात मोठा विश्वासघात आहे. राहुल गांधी भाजप संविधानाचा पुस्तक दाखवून संविधान बदलून टाकेल असा खोटा दृष्टीकोन पसरवत आहेत. पण प्रत्यक्षात देशाला 400 वर्ष मागे नेण्याची काँग्रेसची योजना असल्याचा त्यांनी सांगितलं. ओबीसी, मराठा, धनगर समाज इथे आरक्षणासाठी लढत आहेत. पण ते देण्याऐवजी राहुल गांधी त्यांचं आरक्षण संपवण्याची भाषा करत आहेत. त्यांची जीभ कापणाऱ्याला मी अकरा लाखांचा बक्षीस देईल.” असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम