Political Affairs | आज दिवसभर राज्याच्या राजकारणात काय काय घडले. हे थोडक्यात जाणून घेऊयात…
१. मंत्री दादा भुसेंचा दावा
महायुतीत नाशिकच्या जागेचा वाद सुरू असून, तिन्ही पक्षांमध्ये यावरून खडाजंगी सुरू आहे. आतापर्यंत शिवसेनेतून हेमंत गोडसे आणि संजय शिरसाठ यांनीच नाशिकच्या जागेवर दावा केला होता. मात्र, आता पालकमंत्री दादाजी भुसे यांनीही नाशिकची जागा ही शिवसेनेचीच असून, यावर चर्चा सुरू आहे. तसेच महायुतीत सर्वांचे विचार हे एक असून, आम्ही एकदिलाने काम करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
२. ‘हा’ आहे गोडसेंची उमेदवारी जाहीर होण्याचा माहुर्त..?
गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार छगन भुजबळ आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे दिल्लीत तळ ठोकून आहे. यातच आता पुढील दोन तीन दिवसांत म्हणजेच गुढीपाडवाच्या आधीच आपल्या उमेदवारीची घोषणा होणार असल्याची माहिती हेमंत गोडसे यांनी माध्यमांना दिली आहे. (Political Affairs)
३. फडणवीस सूळेंच्या प्रचारकाच्या भेटीला
देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरमध्ये सभा होत असून, या सभेपूर्वी त्यांनी सोनाई डेअरीचे चेअरमन प्रवीण माने यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यात काहीवेळ चर्चाही झाली. प्रवीण माने हे सुप्रिया सुळे यांचा इंदापूरमध्ये प्रचार करत होते. त्यामुळे आता ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.
Loksabha Election | पारावर वाचले जाताय खासदारांच्या कामांचे पाढे
४. ज्योती मेटे या वंचितकडून निवडणूक लढवणार..?
बीड लोकसभा मतदार संघात दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. मात्र, शरद पवार गटाने बीडमधून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली असून, आता ज्योती मेटे या वंचितकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. (Political Affairs)
५. तो वरुन येणारा फोन तेवढा बंद करा…
“तालुक्यात पोलीस त्यांचे काम चोखपणे करत असून, काही प्रकरणांमध्ये मात्र पोलिसांवर दबाव आणला जातोय. खोट्या केस दाखल केल्या जाताय. पोलिसांना वरुन कोणाचा तरी फोन येतो. तो वरुन येणारा फोन तेवढा बंद करा” या शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांच्या विरोधात फडणवीसांसमोर तक्रारींचा पाढा वाचून दाखवला.
Political Affairs | ६. महाविकास आघाडीत बिघाडी –
महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून वाद असून, येथून ठाकरे गटाने काँग्रेसला विचारात न घेता डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांना राज्यसभेवर किंवा विधानसभेत उमेदवारी देण्याचा पर्याय पुढे करून काँग्रेसची नाराजी मिटवण्याचा प्रस्ताव दिल्ली काँग्रेसकडे पाठवण्यात आला आहे. (Political Affairs)
Nashik Loksabha | हेमंत गोडसेंच्या तिकीटासाठी मंत्री दादा भुसे मैदानात
७. जाताना अशोक चव्हाण काँग्रेसचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करुन गेले
महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेत अशोक चव्हाणांची भूमिका ही महत्त्वाची होती. दरम्यान, या चर्चांमध्ये काँग्रेसच्या काही पारंपरिक मतदारसंघांवर दावा करायचे सोडून चव्हाणांनी इतरच मतदारसंघांवर दावा केला होता. त्यामुळे काँग्रेसच्या पारंपरिक जागा ठाकरे गट आणि शरद पवारांना द्याव्या लागल्याची काँग्रेसचे आरोप
८. टायमिंग किती भारी; अर्ज भरण्याच्या वेळीच निकाल लागतो
भाजपच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राना यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीच सर्वोच्च न्यायालयाने नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र हे वैध ठरवलं असून, याबाबत बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. यावरून “आणखी किती वेळा रडणार, आता लोकांची सहानुभूती संपलीय. बरं टायमिंगही किती व्यवस्थित आहे. अगदी अर्ज भरण्याच्या वेळीच निकाल लागतो. एवढ्या टाइमिंगवर सर्वोच्च न्यायालय कसे चालते, अशी खोचक टिका बच्चू कडू यांनी केली आहे. (Political Affairs)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम