शिर्डी : या निवडणुकीत भाजपने ४०० पार चा नारा दिला असून, हे राज्यातील भाजप नेत्यांनी चांगलेच मनावर घेतल्याचे दिसत आहे. गेल्या महिन्याभरात अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेकदा महाराष्ट्रात आले असून, महायुतीच्या अनेक उमेदवारांसाठी त्यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथे भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेतली असून, यावेळी त्यांनी काँग्रेसवर यके आरोप केले. काँग्रेस आतंकवादी कसाबची बाजू घेतंय, हा आपल्या शहीदांचा अपमान आहे, काँग्रेस नेत्याने धक्कादायक वक्तव्य केलंय, असा निशाणाच त्यांनी काँग्रेस आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर साधला. (PM Narendra Modi)
काँग्रेस नेत्याने कसाबला निर्दोष म्हटलं
२६/११ रोजीचा मुंबई येथील हल्ला कोणी केला होता..? असा सवाल या सभेत मोदींनी उपस्थित नागरिकांना विचारला. याच २६/११ चा हल्ल्याबाबत एका काँग्रेसचे नेत्याने भयानक विधान केलेअसून, या काँग्रेस नेत्याने आतंकवादी कसाबला निर्दोष म्हटलं आहे आणि हा त्या शहीदांचा अपमान आहे.(PM Narendra Modi)
PM Narendra Modi | मोदींची पिंपळगावमध्ये सभा; भुजबळांची मोठी माहिती
काँग्रेसला मुस्लिम लीग बनवून टाकलं
महाराष्ट्र राज्याच्या विकासात अहमदनगर जिल्हा हा दिशा देणारा जिल्हा आहे. यात विखे पाटील यांचं मोठं योगदान असल्याची मला आज आठवण झाली. आज देशात तिसऱ्या पर्वाचे मतदान सुरू असून, बीजेपी आणि एनडीएला देशातून भरपूर जन समर्थन मिळत आहे.(PM Narendra Modi)
चार जून ही विरोधकांच्या इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता फिक्स झाली आहे. निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या इंडिया आघाडीचा किल्ला हा मातीच्या किल्ल्यासारखा ढासळणार आहे. इंडिया आघाडी ही आपल्याच लोकांच्या तुष्टीकरणात लागली आहे. काँग्रेसला त्यांनी मुस्लिम लीग बनवून टाकलंय, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.
PM Narendra Modi | पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस
ते आरक्षण मुस्लिमांना देतील
एनडीएचा मुद्दा हा विकास, सुरक्षा, सन्मान, स्वाभिमान, असा आहे. मात्र काँग्रेस यापैकी कुठल्याही मुद्द्यावर बोलत नाही. काँग्रेस हे शहामृगासारखं डोकं लपवून बसलं आहे. काँग्रेसने गेली ५० वर्ष गरिबी संपविण्याचा आश्वासन देऊन लोकांचा केवळ विश्वासघात केला आहे. जर देशात इंडिया आघाडीचे सरकार आले तर, ते गोरगरिबांचे आरक्षण काढून घेऊन ते आरक्षण मुस्लिमांना देतील. स्वतःच्या वोट बँकेला खुश करण्यासाठी त्यांचा हा सर्व प्रयत्न आहे, असा आरोपही यावेळी मोदींनी काँग्रेसवर केला. (PM Narendra Modi)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम