PM Narendra Modi | मोदींनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा; ‘या’ तारखेला होणार शपथविधी..?

0
38
PM Narendra Modi
PM Narendra Modi

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्यासाठी राष्ट्रपती भवनात दाखल झाले असून, त्यांनी आपला पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपवला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच एनडीएच्या घटक पक्षांतील नेत्यांकडून सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा असल्याचे पत्रदेखील ते राष्ट्रपतींकडे देण्याची शक्यता असून, मोदी हे ८ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याचीही शक्यता आहे.(PM Narendra Modi) तर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान मोदींचा पंतप्रधान पदाचा राजीनामा मंजूर केला असून मोदी आतापासून काळजीवाहू पंतप्रधान म्हणून पुढील जबाबदारी सांभाळणार आहेत.

नितीश कुमार, चंद्रबाबू डिमांडमध्ये; मागितली महत्त्वाची खाती

भाजपचे स्वबळावर सत्तास्थापन करण्याचे स्वप्न भंगले असून, भजपचा ४०० पारचा नाराही फेल ठरला आहे. लोकसभा निवडणुकीत एनडीएला २९२ जागा मिळाल्यामुळे लोकसभा निवडणुकीत बहुमत नसल्याने सरकार स्थापन करण्यासाठी आता भाजपला मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. नितीश कुमार व चंद्रबाबू नायडू यांच्या एनडीएतील घटक पक्षांच्या मदतीची गरज आहे.(PM Narendra Modi)

दरम्यान, हे दोघे नेते सध्या किंगमेकरच्या भूमिकेत असून, याचाच फायदा नितीश कुमार आणि चंद्रबाबू घेत असल्याचे दिसत आहे. हे दोघे नेत्यांनी सत्ता स्थापनेत पाठिंबा देण्यासाठी भाजपकडे काही महत्त्वाच्या खात्यांची मागणी केल्याचीमाहीत समोर आली आहे. यात शिक्षण, आरोग्य व वित्त तसेच आणखी खात्यांचा समावेश आहे. नितीश कुमार हे जेडीयूचे तर चंद्रबाबू हे टीडीपी या पक्षाचे प्रमुख आहेत.(Narendra Modi Oathtaking Ceremony)

Dindori Lok Sabha Result | भाजपने ओवर कॉन्फिडन्समुळे दिंडोरीचा बालेकिल्ला गमावला; निकालाची वैशिष्ट्य काय?

PM Narendra Modi | मोदी ८ जून रोजी तिसऱ्यांदा शपथ घेणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिल्याचे माहिती समोर आली असून, आता एनडीए कुठल्याही क्षणी सत्ता स्थापनेचा दावा करू शकते. तर, ८ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.  मोदी यांचा हा शपथविधी राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. तसेच यानंतर आंध्रप्रदेश विधासभेसाठी ९ जून आणि ओडीसा विधानसभेसाठी १० जूनला शपथविधी सोहळा पार पडण्याचीदेखील शक्यता आहे. (PM Narendra Modi)

Gold Silver Price 5 June 2024 | निकालाचा परिणाम सोने चांदीच्या किंमतींवर; असे आहेत दर


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here